
अनेकजण पदोन्नतीसाठी कामावर खूप मेहनत घेतात. काहीजण दिवसातील 15 ते 16 तास काम करतात. मात्र, अपेक्षित पगारवाढ किंवा पदोन्नती मिळत नाही, तेव्हा ते निराश होतात आणि दुसरी नोकरी शोधतात. मात्र, एका महिलेला पदोन्नती नाकरल्याने तिने निराश न होता मेहनत घेतली आणि काही वर्षातच ती कंपनी विकत घेत बॉसलाच कामावरून काढून टाकले. सध्या या कंपनीची आणि या महिलेची सोशल मिडीयावर चर्चा होत आहे.
पदोन्नती न मिळाल्याने संतापलेल्या एका महिला कर्मचाऱ्याने आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे. या महिलेला पदोन्नती मिळाली नाही तेव्हा तिने संपूर्ण कंपनी विकत घेतली आणि तिच्या बॉसला कामावरून काढून टाकले. संबधीत महिला कर्मचाऱ्याला अॅपलबीज कंपनीत सीईओ पदाचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, नंतर तिला पदोन्नती नाकारण्यात आली. काही वर्षांनी, महिलेने संपूर्ण अॅपलबीज कंपनी विकत घेतली आणि पदोन्नतीचे खोटे आश्वासन देणाऱ्या बॉसलाच कामावरून काढले. People याबाबतचे वृत्त दिले आहे.
मालिका निर्माती आणि रेस्टॉरंट ग्रुप एक्झिक्युटिव्ह ज्युलिया स्टीवर्ट यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितले की, ती पूर्वी Applebee च्या कंपनीत काम करत होती. तिला आश्वासन देण्यात आले होते की जर तिने कंपनीला मोठा नफा मिळवून दिला तर तिला CEO पदावर पदोन्नती दिली जाईल. स्टीवर्ट सांगते की, तिने एक नवीन टीम तयार केली आणि कंपनीला पुढे नेण्यासाठी दिवसरात्र काम केले. स्टीवर्टने तीन वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर कंपनीला नफा मिळवून दिला. त्यानंतर स्टीवर्ट CEO पदाच्या पदोन्नतीबाबत विचारणा केली. बॉसने आपण असे कोणतेही आश्वासन दिले नसून तिला पदोन्नती नाकारली. तिने पदोन्नती नाकारण्याचे कारण विचारले तेव्हा तिला कोणतेही उत्तर देण्यात आले नाही.
बॉसने खोटे आश्वासन दिल्याच्या रागातून स्टीवर्टने अॅपलबीजमधून राजीनामा दिला आणि आयएचओपी (इंटरनॅशनल हाऊस ऑफ पॅनकेक्स) या कंपनीत दाखल झाली. तिने पाच वर्षे आयएचओपीमध्ये मनापासून काम केले. कंपनीला चांगले यश मिळवल्यानंतर संचालक मंडळाने तिला दुसरी कंपनी खरेदी करण्याचा सल्ला दिला. दुसरी कंपनी खरेदी करण्याच्या सूचना मिळताच स्टीवर्टने तिची जुनी अॅपलबीज कंपनी २.३ अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतली. त्यानंतर स्टीवर्टने तिचा जुना बॉस, अॅपलबीजचे सीईओ यांना कंपनीतून काढून टाकले, ज्यांनी तिला एकदा सीईओ बनवण्याचे खोटे आश्वासन दिले होते. खोटे आश्वासन मिळाल्याने आपण निराश झालो नाही. पुन्हा जोमाने काम केले आणि कंपनी विकत घेत खोटे आश्वासन देणाऱ्या बॉसलाच रंपनीतून काढून टाकले, असे त्यांनी सांगितले.