तिसरीही मुलगी झाली म्हणून सासरच्यांकडून छळ, तीन मुलींसह आईची आत्महत्या

1494

तिसरीही मुलगी झाली म्हणून सासरच्या मंडळींनी महिलेचा छळ केला. या छळाला कंटाळून पीडित महिलेने तीनही मुलींसह विहरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. नगर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मृत महिलेचा पती, सासू व सासरे यांना अटक करण्यात आली आहे.

नगर जिल्ह्यातील स्वाती या महिलेचे 2007 साली राम कारेल यांच्याशी लग्न झाले जाले होते. या दाम्पत्याला तीन मुली झाल्या. तिनही मुली जिल्हा परिषद शाळेत शिकत होत्या. पहिली मुलगी 11 वर्षाची, दुसरी मुलगी 9 वर्षाची तर तिसरी मुलगी 7 वर्षाची होती.

तिसरी मुलगी 7 वर्षे झाल्यापासून स्वातीचा पती राम कार्ले, सासरे दिनकर कार्ले व सासू शिलावती कार्ले हे तिला वेळोवेळी उपाशीपोटी ठेवून आम्हाला मुलगा हवा आहे म्हणून तिचा मानसिक व शारीरिक छळ करीत होते.  सासरची मंडळी आपल्याला खूप त्रास देत असल्याची तक्रार स्वातीने आपल्या माहेरच्या लोकांकडे दिली होती. अखेर या छळाला कंटाळून पीडीत महिलेने आपल्या तिनही मुलींसह विहरीत उडी मारून आत्महत्या केली.

या प्रकरणी मृत महिलेच्या माहेरच्या मंडीळींनी पती, सासू आणि सासर्‍यांविरोधात पोलिसांत तक्रार केली. महिलेला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या