महिला दिनानिमित्त… कवींच्या आयुष्यात स्त्रीचं योगदान

200

सामना प्रतिनिधी । मुंबई  

साधारणतः महिलांचं योगदानाचा विचार केला जातो, मात्र चार मोठ्या महान कवींच्या आयुष्यातल्या स्त्रीचं योगदान काय किंवा त्यांच्या कवितेतली स्त्री काय म्हणते ? हे रसिकांपर्यंत पोहोचण्यासाठी या कार्यक्रमाचं सादरीकरण आम्ही करत आहोत. तसेच यावेळी त्यांच्या कविता, संग्रहातील चित्रफिती आणि त्यांची गाणी असा आनंद रसिकांना घेता येणार आहे 

महिला दिनानिमित्त बर्‍याचदा स्त्रियांच्या योगदानाचा विचार केला जातो, मात्र गगन सदन… चांद मातला…माझ्या प्रीतीच्या पाखरा…तेथे कर माझे जुळती…पहिलीच भेट झाली…डोळे कशासाठी… डोळ्यावरून माझ्या… अशी एकापेक्षा एक सदाबहार गाणी ज्या महान कविंकडून आपल्याला लाभली. त्याचाही या दिनानिमित्त विचार व्हायला हवा. ते ज्येष्ठ कवी म्हणजे बा. भ. बोरकर, विं. दा. करंदीकर, बसंत बापट आणि मंगेश पाडगावकर. या कविंच्या कवितेतून व्यक्त झालेली स्त्री ‘एक आनंदगाणे’ या दर्जेदार कलाकृतीद्वारे रसिकांना उलगडणार आहे. शुक्रतारा निर्मित आणि कल्चरल पार्टनर यांच्या सहयोगाने 8 मार्च रोजी रात्रौ 8.30 वाजता कालिदास नाट्यगृह, मुलुंड येथे हा कार्यक्रम सादर होईल.

या कार्यक्रमाच्या अनोखेपणाविषयी शुक्रताराचे निर्माते अतुल दाते सांगतात, बा. भ. बोरकर, वसंत बापट, विं. दा. करंदीकर, मंगेश पाडगावकर या महान कवींच्या एकत्रित कार्यक्रमाविषयी मला नेहमी कुतूहल होतं की, हे सर्व कलाकर एकत्र कविता वाचनाचे कार्यक्रम कसे करत असतील. याकरिता त्यांचे पुत्र अजित पाडगावकर यांची भेट घेतली. तेव्हा या कवींचा एकमेकांशी झालेला पत्रव्यवहार मला सांगितला. तो माझ्याकडे आहे. तेव्हा या तिघांवर कार्यक्रम करण्याची संकल्पना सुचली. यातूनच ‘आनंदगाणे’ निर्मिती झाली. खास महिलादिनानिमित्त या चौघांच्या कवितेतली स्त्री असा विषय निवडला. या कार्यक्रमातून मिळालेली रक्कम आपल्या सैन्य दलाला अर्पण केली जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या