कार अपघातात हाडं मोडली, महिलेने शरीरात बनवलं कॉम्प्युटर, हातात लावल्या एलईडी

764

जर अपघातात एखादा अवयव निकामी झाला, कायमचं अपंगत्व आलं तर, असा विचार जरी मनात आला तरी परावलंबी होण्याच्या भीतिने भल्याभल्यांची झोप उडते. पण अमेरिकेतील विंटर मेराज या 31 वर्षीय इंजिनियर महिलेच्या हातापायांचा अपघातात  अक्षरश चुरा झाला. पण तरीही हिंमत न हारता तिने तंत्रज्ञानाच्या जोरावर शरीरातच कॉम्प्युटर बसवलं. तिने हातात मायक्रो चिप फिक्स केली असून त्याच्याच मदतीने ती घराबरोबरच ऑफिसमधील काम करत आहे.

micro

काही महिन्यांपूर्वी मेराजच्या कारला अपघात झाला. त्यात तिचे हात, पाय, पाठ , गुडघा यांना गंभीर दुखापत झाली. अपघात इतका भीषण होता की त्यात तिच्या हात, पाय, पाठ आणि दोन्ही गुडघ्यांचे हाड मोडले. त्यामुळे मेराजला प्रत्येक गोष्टींसाठी दुसऱ्याची मदत घ्यावी लागत होती. हे परावलंबी जगणं तिला नकोसे झाले. त्यातूनच मग तिने तंत्रत्रानाच्या मदतीने प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून घेतल्या. त्यानंतर तिने शरीरात मायक्रोचिप बसवून घेतली.  हातात एलईडी लाईट्स लावल्या आणि बोटांमध्ये चुंबक बसवून घेतले. जेणेकरुन तिला लहानमोठ्या कामांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज  नसेल. त्यानंतर मी सामान्य व्यक्तीप्रमाणे आयुष्य जगत आहे. मायक्रोचिपमुळे दरवाजा उघडणे, बंद करणे, सहज शक्य झाल्याचे मेराज यांनी म्हटले आहे.

 

 

 

आपली प्रतिक्रिया द्या