घरातल्या बाथरुममध्ये सहा दिवस अडकली महिला

751

फ्रान्समधील डिनान शहरात एक 83 वर्षीय महिला सहा दिवस अडकल्याची घटना समोर आली आहे. महिलेचे नाव अद्याप कळाले नाहीये.

महिला एकटीच राहत होती. बाथरुममध्ये ती हात धुण्यासाठी गेली होती. पण नंतर दरवाजाचे लॉकच न उघडल्याने ती आत अडकली. वयस्क असल्याने मदतीसाठी तिला आरडाओरडाही करणे शक्य नव्हते. यामुळे ती बाथरुममध्ये सहा दिवस अन्नावाचून राहीली. शेजाऱ्यांना सहा दिवस महिला न दिसल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या घरात प्रवेश केला. त्यावेळी महिला घरात नसल्याचे त्यांना आढळले. पण ती बाथरुममध्ये बेशुद्धावस्थेत त्यांना आढळली. त्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या