50 टक्के महिलांच्या डोक्यात ब्रेकअपपूर्वी तयार असतो प्लॅन बी, सर्वेक्षणातून उघड झाली बाब

आजकाल नात्यात अनेकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत चालली आहे. रिलेशनशिप ते लग्नापर्यंतच्या संबंधांमध्ये जोडीदार नेहमीच त्यांना साथ देईल की नाही? यावर एकमेकांना विश्वास ठेवण्यास लोक घाबरतात. गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड आणि दीर्घ काळ चालणाऱ्या रिलेशनशिपमध्ये याची जास्त शक्यता असते. आपल्याला कदाचित विश्वास बसणार नाही. मात्र आता इतर कामांप्रमाणे प्रेमातही ‘प्लॅन बी’ बनवला जातो. ‘प्लॅन बी’ म्हणजे बॅकअप पार्टनर, एका सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे.

डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जवळजवळ 50 टक्के महिला आपल्या ब्रेकअपच्या आधी, बॅकअप प्लॅन बनून ठेवतात. याचा अर्थ असा आहे की महिलांच्या मनात, बहुतेकदा दुसर्‍या पुरुषाचा विचार सुरु असतो. जो ब्रेकअपच्या वेळी त्या ‘प्लॅन बी’ सारखा वापरतात. आश्चर्याची बाब ही आहे की रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या महिलेच्या अपेक्षा विवाहित महिलेपेक्षा अधिक असतात. बॅकअप पार्टनर म्हणजे नक्की काय? अभ्यासानुसार, बहुतेक प्रकरणांमध्ये हा एक जुना मित्र असू शकतो ज्याला त्या महिलेबद्दल आधीच आकर्षण वाटत असते किंवा प्रेमभावना असतात. महिलेचा एकेकाळचा हा प्रियकर किंवा पतीदेखील असू शकतो. अभ्यासानुसार, एक महिलांच्या मनामध्ये सध्याच्या साथीदाराशिवाय पर्याय म्हणून ऑफिसमधील सहकारी किंवा जिममधील मित्राचा विचारही घोळत असतो.

या सर्वेक्षणात सुमारे 1000 महिलांनी भाग घेतला. यापैकी बहुतेक महिलांनी सांगितले की, त्यांना एका अशा प्लॅन बी ची आवश्यकता आहे. दर 10 महिलांपैकी एकीने सांगितले की, त्यांच्या बॅकअप पार्टनरने त्यांच्या प्रति असलेल्या भावना त्यांनी आधीच व्यक्त केल्या असतात. बर्‍याच महिलांनी असेही म्हटले आहे की, त्यांनी रिलेशनशिपमध्ये असतानाच त्यांचा ‘प्लॅन बी’ पार्टनर ठरवलेला असतो. अभ्यासानुसार, 12 टक्के महिलांनी सांगितले आहे की त्यांना सध्याच्या जोडीदारापेक्षा प्लॅन बी असलेला पुरुष जास्त आवडतो. या सर्वेक्षणात भाग घेणार्‍या बहुतेक महिलांनी हे देखील कबूल केले की, त्यांच्या सध्याच्या जोडीदाराला त्यांच्या दुसऱ्या प्रेमाबद्दल. ‘डेली मेल’मध्ये या सर्वेक्षणासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या