
कोरोनाने नोकरी गिळली म्हणून हातपाय गाळणे मनाला पटले नाही. पुन्हा नोकरीच्या मागे लागायचे तर कधी काय होईल याची शाश्वती नसेल. म्हणून मग व्यवसायातच स्वतःला सिद्ध करण्याचा निर्णय घेणाऱया लालबागच्या मायलेकीची जिद्द, तळमळ इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आंगणेवाडीतील पुळीथ पिठी-नारळापासून धंद्याची सुरुवात करणाऱया सुप्रिया श्रीधर वैद्य व त्यांची मुलगी श्रद्धा निखिल नारिंग्रेकर यांनी प्रभादेवीत चहाचा व्यवसाय थाटलाय.
सुप्रिया व श्रद्धा दोघीही लालबागच्या मराठमोळ्या वस्तीतील. सुप्रिया विक्रोळीच्या गोदरेज हॉस्पिटलमध्ये तर श्रद्धा साकीनाक्यात खासगी पंपनीत कामाला होत्या. कोरोना महामारीमुळे दोघींनाही नोकरी गमवावी लागली. आता नोकरी पुठे शोधायची, ती वेळेत मिळेल का, असे प्रश्न या मायलेकाRपुढेही उभे ठाकले. मात्र दोघींनी या प्रश्नांच्या गर्तेत हिंमत न हारता थेट व्यवसायाच्याच दिशेने वाटचाल सुरू केली. सुप्रिया घरी मास्क शिवून विपू लागल्या, तर श्रद्धा यांनी कोकणातील आंगणेवाडीतून नारळ व पिठी आणून त्याची लालबाग, परळ परिसरात विक्री सुरू केली. यातून उत्साह वाढत गेला, तसतशी आणखी काही तरी करण्याची जिद्द जागृत झाली. याच जिद्दीतून दोघींनी प्रभादेवीत चहा-नाश्त्याचा व्यवसाय थाटला आहे. अडीच वर्षांच्या मुलीला सासू-सासऱयांच्या ताब्यात ठेवून श्रद्धा दिवसभर धंद्यात व्यस्त असतात. दोघींनी नोकरी सोडल्यानंतर पंपन्यांकडून मिळालेल्या पैशांतून व्यवसायासाठी भांडवल उभारणी केलीय. काही प्रमाणात कर्जही घेतले. व्यवसायात अवघ्या सहा महिन्यांतच त्यांनी चांगला जम बसवला आहे. स्वच्छता, हसतमुख सेवा, चहा-नाश्त्याची उत्तम चव अशा विविध वैशिष्टय़ांमुळे मायलेकाRच्या व्यवसायाला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
आम्ही कोरोना महामारीकडे केवळ संकट म्हणून नव्हे, तर एक सुवर्णसंधी म्हणूनही पाहिले. मराठी माणसांनी व्यवसायात पुढे आले पाहिजे हे आम्हाला प्रकर्षाने जाणवले. याच विचारातून आम्ही व्यवसायाच्या वेगवेगळ्या पर्यायांचा विचार सुरू केला होता. याचदरम्यान चहाच्या व्यवसायाची निवड केली. या व्यवसायाने आम्हा दोघींचा आत्मविश्वास वाढला आहे.
- सुप्रिया वैद्य





























































