मोठी बातमी! आशिया चषक अनिश्चित काळासाठी स्थगित, कारणही आलं समोर; वाचा…

श्रीलंकामध्ये 6 जून 2025 पासून ACC महिला इमर्जिंग आशिया चषकाचा दुसरा हंगाम सुरू होणार होता. परंतु ही स्पर्धा आता अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. स्पर्धा सुरू होण्यास काही दिवसांचा कालावधी शिल्लक असतानाच ACC अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी स्पर्धा स्थगित करण्यात आल्याची माहिती दिली.

अचनाक स्पर्धा स्थगित करण्यात आल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याच धक्का बसला. परंतु एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी स्पर्धा स्थगित करण्यात येण्यामागचे कारण सांगितले आहे. त्यांनी दिलेल्या स्पष्टिकरणानुसार, सध्या श्रीलंकामध्ये चिकनगुनियाने डोकं वर काढलं आहे. आरोग्याच्या समस्येमुळे आणि प्रतिकुल हवामानामुळे श्रीलंका क्रिकेटने स्पर्धा स्थगित करून पुन्हा आयोजित करण्याची विनंती केली होती. त्यामुळे स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे.