वर्क फ्रॉम होममुळे होतेय पाठदुखी? मग या आहेत टिप्स…

कोरोनामुळे सध्या संपूर्ण जगातील लोकांची बिकट परिस्थिती झाली आहे. त्यातही कितीतरी कामगारांना वर्क फ्रॉम होम करावे लागत आहे. याचा परिणाम असा झाला आहे की ऑफिसपेक्षाही घरातून जास्त काम करावे लागत आहे. त्याशिवाय घरी कसंही बसून काम केल्याने अनेक जणांना आता पाठदुखीचाही त्रास जाणवू लागला आहे. केवळ पाठ दुखी नाही तर मानदुखीही याबरोबर चालू झाली आहे. पण ही पाठदुखी आणि मान दुखी असली तरीही त्याचा त्रास नक्की कसा कमी करायचा, याचा सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर हिने एका व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तिने यामध्ये काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. तुम्ही जर सध्या घरातून काम करत असाल आणि तुम्हालाही असा त्रास सहन करावा लागत असेल तर तुमच्यासाठी या खास टिप्स-

घरात काम करण्यासाठी अशी जागा निवडा जेणेकरून तुम्हाला बाहेरचं व्यवस्थित दिसू शकेल. कारण तुम्ही सतत लॅपटॉपवर काम करता अशा वेळी डोळ्यांवर ताण पडून न देण्यासाठी तुम्ही मधून मधून बाहेर बघू शकता आणि त्यामुळे तुमच्या डोळ्यांवरही ताण येणार नाही आणि तुम्ही व्यवस्थित काम करू शकता. तसेच तुम्ही बसताना तुमची खुर्ची आणि टेबल यातील अंतर नीट बघून बसा.

काम करताना तुम्ही जर खुर्ची घेतली असेल तर तुम्ही पायाखाली एखादी उशी किंवा मोठा लोड घ्या. जेणेकरून तुम्ही बसल्यानंतर तुमच्या पायातील रक्ताभिसरण प्रक्रिया नीट राहील. तसेच तुमची पाठ व्यवस्थित पोश्चरमध्ये राहील आणि तुमच्या मणक्यावर त्याचा ताण पडणार नाही. तुम्हीतुमच्या उंचीच्या मानाने खुर्ची घ्या

साधारण अर्धा तास झाल्यानंतर तुम्ही किमान तीन मिनिटांचा ब्रेक घ्या. ज्यामुळे तुमच्या पाठीला आणि मानेलाही आराम मिळेल. सतत बसून पाठ आणि मान दोन्ही आखडण्याची शक्यता असते.

टेबल अथवा खुर्चीमध्ये काही जास्त प्रॉब्लेम नसतो. पण तुम्ही बसताना त्यावर मांडी घालून काम करायला बसा. जेणेकरून तुमच्या पाठीवर आणि मानेवर ताण येणार नाही. यामुळे तुमच्या पाठीवरील ताण कमी होण्यास मदत मिळते.

काही वेळाने किमान पाच ते दहा सेकंदांसाठी तुमचं शरीर स्ट्रेच करा. कारण तुम्ही सतत बसून राहिल्यावर शरीरामध्ये आणि त्याचा तुमच्या पाठीवर आणि मानेवर अधिक परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही किमान एक तासाच्या अंतराने अथवा मध्ये उठल्यास तुमचे शरीर स्ट्रेच करणे गरजेचे आहे.

मध्ये उठल्यानंतर तुम्ही खुर्ची धरून थोडेसं पाय वर करून त्यावर स्ट्रेच करा. हे जास्त वेळ करू नका. तुम्ही पडू शकता केवळ पाच सेकंदांसाठी ही प्रक्रिया करा. आपल्याला लहानपणी असं खुर्चीला धरून पाय वर करण्याची सवय असते. तोच प्रयोग तुम्ही काम करतानाही मध्ये मध्ये करायचा आहे.

काम करताना तुम्ही मध्येमध्ये तुमचे पाय वर करून स्ट्रेच करा. यामुळे तुमच्या पाठीवर आणि मानेवर ताण येणार नाही

तुमचं वजन जास्त असेल आणि तुम्हाला खाली बसण्याचा त्रास होत नसेल तर काम करण्यासाठी तुम्ही जमिनीवर ब्लॅंकेट घालून त्यावर मांडी घालून बसणे कधीही चांगले. ब्लँकेटच्या तीन घड्या घालून त्यावर बसा आणि भिंतीला टेका. त्यामुळे तुमच्या पाठीला जास्त त्रास होणार नाही तसंच लॅपटॉप छोट्या टेबलवर समोर घ्या आणि काम करा. यामुळे तुम्हाला अतिशय सहजपणे घरातून काम करता येईल. आणि पाठीचा आणि मानेचा त्रासही कमी होईल.

आपली प्रतिक्रिया द्या