वर्क फ्रॉम होममुळे कॉम्पूटर क्षेत्राला फायदा; विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ

675

कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे देशात लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्यास परवानगी दिली आहे. कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करता यावे, यासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांना कॉम्पूटर आणि लॅपटॉप दिले आहेत. त्यामुळे कॉम्पूटर आणि लॅपटॉप विक्री करणाऱ्यांचा फायदा झाला असून त्यांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नवी दिल्लीतील सर्वात मोठे कॉम्पूटर विक्रीचे केंद्र असणाऱ्या नेहरू प्लेसमध्ये 1 ते 15 मार्चदरम्यान 2.50 लाख कॉम्पूचर आणि लॅपटॉपची विक्री झाली आहे.

देशभरातील सुमारे 300 कंपन्यांनी व्यापाऱ्यांना कॉम्पूटर आणि लॅपटॉपची मोठ्या प्रमाणात ऑर्डर दिली होती, असे व्यापारी आणि ट्रेडर्स असोशिएशनचे अध्यक्ष महेंद्र अग्रवाल यांनी सांगितले. त्यामुळे नेहरू प्लेसमधील व्यापाऱ्यांचा मोठा फायदा झाला आहे. तसेच अजूनही विविध कंपन्यांकडून आमच्याकडे ऑर्डर येत आहेत. मात्र, लॉक डाऊनमुळे मार्केट बंद असल्याने अनेक ऑर्डर रद्द कराव्या लागल्याचे त्यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणात ऑर्डर आल्याने तसेच विक्रीत वाढ झाल्याने 20 हजार व्यापाऱ्यांचा फायदा झाला आहे. नेहरू प्लेसमध्ये 20 हजार दुकाने आहेत, जवळपास सर्वन दुकांनाना मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळाल्या होत्या. मात्र, सध्याची परिस्थिती बघता, देशासाठी लॉक डाऊन महत्त्वाचा असल्याने व्यापाऱ्यांकडून त्याला पाठिंबा देण्यात येत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या