Video – सेटवरच वर्कआऊट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘स्टार प्रवाह’वरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचं शूटिंग सध्या सिलवासामध्ये सुरू आहे. मालिकेच्या निमित्ताने एक छान कुटुंब तयार झालं आहे. मालिकेतील संजनाचे इशा आणि गौरीसोबत पटत नसले तरी ऑफक्रीन मात्र त्या चांगल्या मैत्रिणी आहेत.

संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसलेने तिच्या फिटनेसचं रहस्य सांगितलं. रुपाली म्हणाली, सेटवर मी अपूर्वा गोरे (इशा) आणि गौरी कुलकर्णी (गौरी) आम्ही तिघी न चुकता व्यायाम करतो. योगासनांसोबतच निसर्गरम्य वातावरणात तासभर चालणं हे आमचं नित्याचं आहे. शूटिंग संपलं की आम्ही सर्व एकत्र डिनर करतो. त्यानंतर वॉक हा ठरलेला. शूटिंगमधूनही वेळ काढत आम्ही ठरवून व्यायाम करतो. आम्हा सर्वांच्या डाएटचीही सेटवर काळजी घेतली जातेय.