जगातील बेस्ट शाकाहारी खाद्यपदार्थांच्या यादीत ‘या’ मराठमोळ्या खाद्यपदार्थांला स्थान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फास्टफूडच्या जमान्यात हिंदुस्थानी पदार्थांची ओळख जगात होत असल्याने आपल्यापैकी प्रत्येकलाच नक्कीच अभिमान वाटेल. आता भारतीय खाद्यपदार्थांची चव जगात साऱ्यांनाच आवडते आहे. कारण सात हिंदुस्थानी खाद्यपदार्थांनी जगातील सर्वोत्तम शाकाहारी पदार्थांच्या यादीत स्थान मिळवले आहे, विशेष म्हणजे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पदार्थाचा यात समावेश आहे.
महाराष्ट्रातील मिसळ पाव याच्यासह राजमा राईस यांनाही यात स्थान मिळाले आहे. दरम्यान, 2022 मध्ये जगातील सर्वोत्तम पाककृतींच्या जागतिक यादीत रँकिंगमध्ये हिंदुस्थान पाचव्या स्थानावर होता.
शाकाहार ही एक जीवनशैली आहे. त्यात हिंदुस्थानी पदार्थांना जागतिक ओळख मिळत असल्याने याचे सगळ्यांनाच कौतुक आहे. चविष्ठ खाद्यपदार्थांचे अनेक प्रकार इथे पाहायला मिळतात. अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आदी देशांत अनेक मराठी हॉटेल व्यवसायिक पाहायला मिळतात. आता तर जगातील सर्वोत्तम शाकाहारी खाद्यपदार्थांच्या यादीत मिसळ पावचा समावेश झाला आहे. हा पदार्थ 11 व्या स्थानी आहे. यामुळे महाराष्ट्राची मान अधिक उंचावली आहे. मिसळ म्हटले की झणझणीत डीश डोळ्यासमोर उभी राहते. रस्सा, कट आणि कांदा, लिंबू, शेव-चिवडा किंवा फरसाण याचे मिश्रण आणि सोबतीला पाव असतो.
मिसळ पावसोबत आणखी काही पदार्थ आहेत. यात आलू गोबी 20 व्या स्थानावर आहे. तर 22 व्या स्थानी राजमा आहे. 24 व्या स्थानावर कोबी मंच्युरियन आहे. या यादीतील इतर हिंदुस्थानी पदार्थांमध्ये मसाला वडा, भेळपुरी आणि राजमा चावल यांचा समावेश आहे, जे अनुक्रमे 27, 37 आणि 41 व्या स्थानावर आहेत. तसेच मसाला वडा, जो 27 व्या क्रमांकावर आहे. हा एक पारंपारिक दाक्षिणात्य फ्रिटर आहे जो तामिळनाडूमधून आला आहे. प्रत्येकाचा आवडता स्नॅक म्हणजे भेळपुरी. हा एक चवदार नाश्ता आहे. जो सामान्यतः प्रत्येक कॅफे आणि रस्त्यावरील गाड्यांमध्ये मिळतो. मुंबईमध्ये ही डिश अत्यंत लोकप्रिय आहे. या डिशचा समुद्रकिनारी आस्वाद घेतला जातो. टेस्ट अ‍ॅटलासने समाजमाध्यमांवर एक पोस्ट केली आहे. बेस्ट पारंपरिक वेगान खाद्यपदार्थांची यादी प्रसिद्ध केली आहे. यात जगातील चविष्ठ खाद्यपदार्थांची यादी दिली आहे