World cup 2019 : इंग्लंडचा 150 धावांनी दणदणीत विजय

सामना ऑनलाईन । मॅनचेस्टर

इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 398 धावांच्या पहाडासारख्या आव्हानापुढे अफगाणिस्तानचा टिकाव लागू शकला नाही. अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ 50 षटकात 8 बाद 247 धावा करू शकला. इंग्लंडने 150 धावांनी मोठा विजय मिळवला.

मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रफोर्ड मैदानावर यजमान इंग्लंड आणि अफगाणिस्तान संघात सामना रंगला. इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गन यांने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 50 षटकात इंग्लंडने 4 बाद 397 धावांचा डोंगर उभारला. या लढतीत इंग्लंडच्या फलंदाजांनी तब्बल 25 षटकारांचा पाऊस पाडला.

मॉर्गन झाला ‘सिक्सर किंग’, 17 षटकार ठोकत केला विश्वविक्रम
राशिद खानला साहेबांनी कुटले, विश्वविक्रमी धुलाईने कंबरडे मोडले

इंग्लंडचे सलामीवीर जेएम विन्स आणि बेअरस्टोने इंग्लंडला 44 धावांची सलामी दिली. विन्स 26 धावांवर बाद झाल्यानंतर आलेल्या रुट आणि बेअरस्टोमध्ये 100 पेक्षा जास्त धावांची भागिदारी झाली. शतकानजीक आलेला बेअरस्टो 90 धावांवर बाद झाला. त्यानंतर रुट आणि कर्णधार इयान मॉर्गन यांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची तुफानी धुलाई केली. मॉर्गनने अवघ्या 57 चेंडूत शतक ठोकले. मॉर्गनने आपल्या 148 धावांच्या खेळीदरम्यान षटकारांचा पाऊस पाडला. त्याने विश्वविक्रम करत तब्बल 17 षटकार ठोकले. तर रुटने 88 धावांची अर्धशतकी खेळी करत संघाला 350 धावांचा टप्पा ओलांडून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

वाचा लाईव्ह अपडेट –

 • सहावा खेळाडू बा
 • अफगाणिस्तानची वाटचाल पाचव्या पराभकडे
 • 45 षटकानंतर अफगाणिस्तानच्या 5 बाद 227 धावा
 • अफगाणिस्तानचा निम्मा संघ तंबूत
 • अफगाणिस्तानला चौथा धक्का
 • अखेरच्या 10 षटकात विजयासाठी 202 धावांची आवश्यकता
 • 40 षटकानंतर अफगाणिस्तानच्या 3 बाद 196 धावा

 • हशमतुल्लाह शाहिदीचे अर्धशतक

 • अफगान अजगर आणि हशमतुल्लाह शाहिदीत अर्धशतकीय भागिदारी
 • 35 षटकानंतर अफगाणिस्तानच्या 3 बाद 172 धावा
 • अफगाणिस्तानच्या 150 धावा पूर्ण
 • 25 षटकानंतर अफगाणिस्तानच्या 3 बाद 104 धावा
 • अफगाणिस्तानला तिसरा धक्का, रहमत शाह 46 धावांवर बाद
 • रहमत शाह आणि शाहिदीमध्ये 50 धावांची भागिदारी
 • अफगाणिस्तानच्या 100 धावा पूर्ण
 • 20 षटकानंतर अफगाणिस्तानच्या 2 बाद 86 धावा
 • 15 षटकानंतर अफगाणिस्तानच्या 2 बाद 66 धावा
 • अफगाणिस्ताचा दुसरा खेळाडू बाद
 • अफगाणिस्तानच्या 50 धावा पूर्ण

 • 10 षटकानंतर अफगाणिस्तानच्या 1 बाद 48 धावा
 • गुलबदीन नईब आणि रहमत शाहने डाव सावरला
 • पाच षटकानंतर अफगाणिस्तानच्या 1 बाद 13 धावा
 • नूर अली जरदान शून्यावर माघारी
 • अफगाणिस्ताची खराब सुरुवात, पहिला खेळाडू बाद

 • इंग्लंडच्या अफगाणिस्तानसमोर 398 धावांचे आव्हान