World Cup 2019- ‘या’ दिवशी जाहीर होणार हिंदुस्थानी क्रिकेट संघ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी मानला गेलेला विश्वचषक आता अवघा दीड महिन्यावर येऊन ठेपला आहे. दर सामन्यागणिक उत्कंठा वाढवत नेणाऱ्या या मालिकेसाठी हिंदुस्थानच्या कुठल्या खेळाडूची वर्णी लागणार, याचीही उत्सुकता लागून राहिली आहे. या प्रश्नाचं उत्तर आता मिळणार आहे.

क्रिकेट विश्वचषक 2019साठी हिंदुस्थानच्या 15 सदस्यीय संघाची निवड 15 एप्रिल रोजी मुंबईत केली जाणार आहे. बीसीसीआयची निवड समिती आणि पदाधिकाऱ्यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. वास्तविक ही घोषणा 23 एप्रिल रोजी होणार होती. मात्र, आठ दिवस आधीच ही घोषणा केली जाणार आहे.

हिंदुस्थानी क्रिकेट संघात कर्णधार विराट कोहलीसह अनेक खेळाडूंची जागा संघात निश्चित आहे. तर असेही काही खेळाडू आहेत, ज्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यात ऋषभ पंत, अंबाती रायुडू, विजय शंकर, नवदीप सैनी आदी खेळाडूंच्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशीही याबाबतीत सल्ला मसलत केली जाणार आहे.