17 वर्षीय इसोला जागतिक सायकल स्पर्धेत रौप्य पदक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन ।नवी दिल्ली 

अंदमान निकोबार बेटावरील 17 वर्षीय इसो अल्बेन याने स्वित्झर्लंड येथे पार पडलेल्या ज्युनियर जागतिक सायकलिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक पटकावत इतिहास रचला. जागतिक स्पर्धेतील हिंदुस्थानचे हे पहिलेच पदक ठरले हे विशेष. इसो अल्बेन याचे ज्युनियर ट्रक वर्ल्ड सायकलिंग चॅम्पियनशिपमधील गोल्ड मेडल थोडक्यासाठी हुकले. झेक प्रजासत्ताकच्या जाकूब स्टॅस्टनी याने 10.851 सेंकद अशी वेळ देत सुवर्ण पदक जिंकले. इसो अल्बेन याचा पहिला क्रमांक 0.017 सेंकदांनी हुकला. कझाकस्तानच्या आंद्रे चुगेने कांस्य पदक जिंकले. या देदीप्यमान विजयानंतर इसो अल्बे म्हणाला, मला गोल्ड मेडल जिंकता आले असते. पण वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकल्याचा आनंद काही औरच आहे. देशासाठी पदक जिंकता आल्याने समाधानी आहे.