World Egg Day – फ्रीजमध्ये अंडी ठेवावीत की नाही? 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

9 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक अंडी दिन’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस ऑक्टोबर महिन्याच्या दुसर्‍या शुक्रवारी साजरा केला जातो. अंडी ही जगभरात आवडीने खाल्ली जातात. हे असं खाद्यपदार्थ आहे जे झटपट बनवता येते आणि खूप चवदार देखील असते. एका अंड्यातून आपण अनेक प्रकारचे पदार्थ बनवू शकता. अनेक लोक अंडी खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवतात. मात्र अंडी फ्रीजमध्ये ठेवावीत की नाही? आज आम्ही तुम्हाला याबद्दलच माहिती सांगणार आहोत.

अंडी फ्रीजमध्ये ठेवल्याने चांगली राहतात असे आपल्याला वाटते. मात्र अशाप्रकारे फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी वैज्ञानिकांच्या मते आरोग्यासाठी धोकादायक असतात.

eggs-in-fridge-6-jpg

फ्रिजमध्ये अंडी ठेवण्याचे बरेच नुकसान आहेत. अंडी फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यावर बॅक्टीरिया निर्माण होऊ शकतात. फ्रीजमधील अंडी 30 ते 40 दिवस चांगली राहतात. मात्र अनेक दिवस फिजमध्ये अंडी ठेवल्यास त्यातील ताजेपणा, चव पोषकद्रव्ये निघून जातात आणि त्याचा शरीराला काहीच उपयोग होत नाही.

eggs-in-fridge-8-jpg

तसेच अंडी अधिक थंड झाल्यास आपल्या शरीराला आवश्यक असणारी पोषकद्रव्ये त्यातून निघून जतात.