फिट राहायचयं? मग पोटभर हसा

149

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जगभरात World Laughter Day साजरा होत आहे. यापार्श्वभूमीवर हसण्याचा आणि जगण्याचा काय संबंध आहे ते जाणून घेऊ या? हिंदुस्थानमध्ये सर्वात आधी वर्ल्ड लाफ्टर डे मुंबईत सुरू झाला. 10 मे 1998 रोजी डॉक्टर मदन कटारिया यांनी सुरू केला .तेव्हापासून देशात वर्ल्ड लाफ्टर डे साजरा करण्यात येत आहे.

laugh-f

हसल्यामुळे तणाव कमी होतो. जवळजवळ 45 मिनिटांसाठी स्नायू शिथिल होतात. ज्यामुळे फ्रेश वाटते.

झोप चांगली लागते. रात्री झोपण्याआधी मनमोकळेपणाने हसावे, विनोद करावे . यामुळे तणाव कमी होतोच. शिवाय दिवसभराचा थकवा नाहीसा होऊन शांत झोप लागते.

sleeping-man

हसल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हसल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढवणाऱ्या पेशींची संख्या वाढते. यामुळे सर्दी पडश्यासारखे आजार होत नाहीत.अॅलर्जी व संसर्ग होत नाही.

kids-laughing

हसल्यामुळे अकाली वृध्दत्व येत नाही. हसताना चेहऱ्यावरील 15 स्नायू एकत्र येतात. ज्यामुळे चेहऱ्यावरील तेज वाढते. शरीरात रक्ताभिरण होते. ज्यामुळे शरीराला ऑक्सीजन मिळते.जे हृ्यासाठी आवश्यक असते. हसल्यामुळे हृ्यविकार, व हृ्यविकाराशी संबंधीत आजार बरे होतात.

आपली प्रतिक्रिया द्या