मुंबईत उत्साहात विज्ञान दिन साजरा; मुंबई प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचा स्तुत्य उपक्रम

302

राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी मुंबईत विज्ञान परिषदेने ‘21 व्या शतकातील विज्ञान शिक्षकांसमोरील आव्हाने’ या कार्यक्रमाचे माटुंगा येथील गुरुनानक खालसा महाविद्यालयात आयोजन केले होते. ‘अवाढव्य ब्रम्हांडात राहूनही मनुष्याने ज्ञान मिळवल्यामुळे त्याची ‘वैज्ञानिक’दृष्ट्या  विचार करण्याची बुद्धी प्रगत झाली आणि त्यामुळे तंत्रज्ञानाचेही आकलन करता आले. मात्र सध्या ते आपल्या पाल्यांपर्यंत पोहचू न देता, त्यांच्यावर पुस्तकी ज्ञानाचे संस्कार का करता, यामुळे देशाची प्रगती कशी होणार, असा प्रश्न भाभा आटोमिक अणूसंशोधन केंद्रातील (बीएआरसी) संशोधक आणि वैज्ञानिक अधिकारी डॉ संतोष टकले यांनी शिक्षकांना केला. यावेळी मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा अंजली नाईक, खालसा महाविद्यालयाचे प्राचार्य किरण माणगावकर, प्राधिकरणाच्या बालशिक्षण विभागाचे प्रमुख निबांजी गिते यांची उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या