जगातील सर्वात कमी उंचीचा तरुण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गिनिज बुकात आपल्या नावाची नोंद व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. नुकतीच इराणच्या 20 वर्षीय अफशिन इस्माइल घादेरजादेह या तरुणाची ही इच्छा पूर्ण झाली आहे. तो जगातील सर्वात कमी उंचीचा तरुण ठरला असून त्याची उंची केवळ 2 फूट 1 इंच, तर वजन 6.5 किलो इतके आहे. शारीरिकदृष्टय़ा तो इतका कमजोर आहे की, मोबाईल फोनसुद्धा त्याला जड वाटतो. इराणच्या वेस्ट अजरबेजान प्रोव्हिंसच्या बुकान काऊंट येथील तो रहिवासी आहे. गिनिज बुकात नाव नोंदवले गेल्यामुळे जगात आपली वेगळी ओळख होईल असे त्याला वाटते. यापूर्वी सर्वाधिक कमी उंचीच्या तरुणाचा रेकॉर्ड कोलंबियाच्या 36 वर्षीय एडवर्ड निनोच्या नावावर होता. त्याची उंची 2.7 इंच इतकी आहे.