
ग्रामीण भागांमधील आरोग्य सेवा प्रणाली मजबूत बनविण्याकरिता ‘वर्ल्ड व्हिजन इंडिया’ सातत्याने सहकार्य करत आहे. कोरोना महामारीच्या संकटात शहरी तसेच ग्रामीण भागात कोविड सेंटर्सना रुग्णालयांची क्षमता वाढविण्यासाठी लाइफ सेविंग, मेडिकल किट, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स यांसारख्या उपकरणांची मदत करून आधार देण्याच काम ‘वर्ल्ड व्हिजन इंडिया’च्या माध्यमातून करण्यात येत आहे.
कोरोना महामारीच्या दुसऱया लाटेत रुग्णांना भासणारी ऑक्सिजनची गरज लक्षात घेता ‘वर्ल्ड व्हिजन इंडिया’द्वारे कोविड केंद्राना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि इतर वैद्यकीय साधनांचा पुरवठा करण्यात आला. मुंबईमधील वांद्रे-कुर्ला व वनिता समाज कोविड केंद्राला पाच लिटर क्षमतेचे 35 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स देण्यात आले. देशभरात 118 ठिकाणी 1000 खाटा आणि पलंगांची सुविधा असलेल्या आरोग्य सुविधांना 1300 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स पुरवली जाणार आहेत.
आरोग्यसेवकांची काळजी
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सव्यतिरिक्त आरोग्यसेवकांच्या सुरक्षेची काळजीही ‘वर्ल्ड व्हिजन इंडिया’द्वारे घेतली जात आहे. यासाठी एन-95 मास्क, सॅनिटायझर आणि हॅण्डग्लोव्हज दिले जात आहेत. याशिवाय थर्मामीटर, पीपीई किट यांसारखी वैद्यकीय उपकरणेदेखील उपलब्ध करून दिली जात आहेत.
लसीकरण जागृती
‘वर्ल्ड व्हिजन इंडिया’द्वारे समाजामध्ये लसीकरणाप्रति देखील जागृकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आह. ज्याकरिता समाजामध्ये विश्वास असलेल्या चांगल्या नेतृत्वांच्या मदतीने आम्ही विविध राज्यांमध्ये कोविड प्रतिबंध आणि कोविड-19 च्या करिता लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगितले जात आहे.
शासनासह ग्रामीण भागांमधील आरोग्य सेवा प्रणाली मजबूत बनविण्याकरिता ‘वर्ल्ड व्हिजन इंडिया’ सातत्याने कार्य करत आहे. अतिशय जलद अशा गतीने ग्रामीण भागातील रुग्णालयांची क्षमता वाढविणे आवश्यक आहे. ज्यामुळे लोकांना तिथल्या तिथे उपचार मिळू शकेल आणि त्यांचा मोलाचा जीव वाचविता येऊ शकेल.
– माधव बेलामकोंडा, सीईओ वर्ल्ड व्हिजन इंडिया



























































