
वरळी बीडीडी चाळ क्र. 88 आणि 89 च्या रहिवाशांनी मंगळवारी म्हाडा मुख्यालयावर धडक दिली. मूळ आराखडय़ानुसार आमचे पुनर्वसन इमारत क्र. 6 मध्येच करा, अशी आग्रही मागणी या चाळकऱ्यांनी केली.
वरळी बीडीडी चाळ क्र. 88 आणि 89 च्या रहिवाशांना इमारत क्र. 6 मध्ये पुनर्वसन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र अचानक या चाळींचा समावेश इमारत क्र. 5 मध्ये केल्यामुळे आम्हाला हक्काची घरे मिळण्यास आणखी विलंब होणार असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
याप्रकरणी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी म्हाडाचे मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांची भेट घेत रहिवाशांच्या मागण्यांवर योग्य तोडगा काढण्याची सूचना केली.
Worli BDD Chawl Protest: Residents Demand Rehabilitation in Building No. 6
Residents of Worli BDD Chawls 88 & 89 protested at MHADA HQ, demanding homes in Building No. 6 as per the original plan. MLA Sunil Shinde intervened.
























































