
वरळीच्या डॉ. ऍनी बेझंट रोडवरील उड्डाणपुलाच्या सभोवताली बसवण्यात आलेले लोखंडी संरक्षक कठडे तुटल्याने जीवघेणे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे या कठडय़ांची तातडीने दुरुस्ती करा अशी मागणी शिवसेनेने राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) केली आहे. शिवसेना नेते, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेवरून नगरसेवक अरविंद भोसले यांनी यासंदर्भात एमएसआरडीसीचे संचालक गायकवाड यांना निवेदन दिले आहे. डॉ. ऍनी बेझंट रोडवरील ऍट्रीया मॉलसमोरील हा उड्डाणपूल वरळी नाका या दिशेने येतो. या उड्डाणपुलावरून रोज हजारो वाहनांची वर्दळ असते.
































































