वरळीतील पोलीस वसाहतींच्या पुनर्बांधणी, दुरुस्तीचा मार्ग मोकळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वरळी पोलीस वसाहतींमधील 9 इमारतींची पुनर्बांधणी व 60 इमारतींची दुरुस्ती व नूतनीकरण यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वसाहतींच्या पुनर्बांधणी, दुरुस्तीसंदर्भात तत्काळ कार्यवाही करण्यात यावी तसेच याविषयीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावा असे निर्देश संबंधित अधिकाऱयांना दिले. यामुळे वर्षानुवर्षे दुरुस्ती रखडलेल्या या इमारतीच्या पुनर्बांधणी तसेच दुरस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.

वरळीतील पोलीस वसाहतींची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. यातील 18 इमारतींची दुरुस्ती झाली असून उर्वरित 60 इमारतींची दुरुस्ती तसेच 9 इमारतींच्या पुनर्बांधणी 2014 पासून रखडली होती. या दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी 91 कोटींच्या निधीची आवश्यकता होती. याबाबत पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला. यांदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक आयोजित केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम किभाग, पोलीस हाऊसिंगशी संबंधित अधिकाऱयांसोबत चर्चा केल्यानंतर या इमारतींच्या दुरुस्ती तसेच पुनर्बांधणीबाबत तत्काळ निर्णय घेण्याचे निर्देश दिले. याकिषयीचा प्रस्तावही तातडीने सादर करण्यास सांगितल्याने या इमारतींत राहणाऱया पोलीस कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. या इमारतींचे टप्प्याटप्प्याने दुरुस्ती करण्यात येणार असून ज्या 9 इमारतींची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये अतिरिक्त एफएसआयच्या माध्यमातून आणखी घरे उपलब्ध करून देता येतील का, त्याचप्रमाणे मोठी घरे उपलब्ध करता येतील का याबाबतही विचार करण्याचे निर्देश देण्यात आले.

या बैठकीला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, परिवहनमंत्री अनिल परब, अतिरिक्त सचिव गृह सीताराम कुंटे, पोलीस सहआयुक्त राजकुमार व्हटकर, पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे कार्यकारी संचालक बिपीन बिहारी, सार्कजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, माजी राज्यमंत्री सचिन अहिर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, माजी आमदार सुनील शिंदे आदी या बैठकीला उपस्थित होते.