चेतन भगतने ‘GenZ’ ला डिवचले; म्हणे हे फक्त मनोरंजनात रमणारे, राजकीयदृष्या अज्ञानी!

सध्याची तरूण पिढी आपल्या मतांवर ठाम राहून भ्रष्टाचाराविरोधात रस्त्यावर उतरताना दिसते. याची सुरूवात नेपाळ पासून झाली. नेपाळमध्ये सरकारविरोधात आवाज उठवत GenZ ने उग्र आंदोलन केलं. यानंतर फ्रान्स आणि मग लडाखमध्येही सारखीच परिस्थिती दिसून आली. त्यामुळे देशभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून GenZ चा मुद्दा आता जगभरात चांगलाच गाजतोय. यावर आता प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लेखक चेतन भगत यांनी नुकतीच NDTV ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी GenZ बद्दलचं त्यांच मत व्यक्त केलं. GenZ पिढीला राजकारणात फारसा रस नाही. याच कारणामुळे त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जातेय, असे चेतन भगत म्हणाले. लवकरच त्यांचे “12 Years, My Messed Up Love Story” हे नवीन पुस्तक प्रकाशित होणार आहे. या पुस्तकात त्यांनी GenZ बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

खरं तर मला या पिढीला राजकीयदृष्ट्या अधिक सक्रिय करायचे आहे, असे चेतन भगत म्हणाले. पण वास्तव काही वेगळेच आहे. या GenZ पिढीत फार कमी लोकांना राजकारणाबद्दल माहिती किंवा ज्ञान आहे. त्यापैकी 90 टक्के लोकांना याबद्दल काहीही माहित नाहीए. सध्याच्या मुलांना वेगळ्याच गोष्टींच टेन्शन असतं. त्यांच्या प्रेयसीने त्यांना मेसेज का केला नाही, त्याने मला फोन का केला नाही, मी आयुष्यात काय करू असे प्रश्न त्यांना पडतायत, असे चेतन भगत म्हणाले.

नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीविरोधात तीव्र निदर्शने; हिंसक घटनांमध्ये 19 जणांचा मृत्यू, 200 हून अधिक जखमी

प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर म्हणूनच त्यांच्या मुद्द्यांवर चर्चा केली जात नाही. कारण त्यांना स्वत: त्याबद्दल काळजी नाहीए. ते वर्तमानपत्र वाचत नाहीत. सर्वात आधी मनोरंजन क्षेत्रात काय होतंय हे पाहतात. त्यामुळे मला वाटते की त्यांनी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्या,” असे ते पुढे म्हणाले.

सध्याची ही पिढी संपूर्णत: इंटरनेटवर अवलंबून आहे. ते सोशल मीडिया आणि इंटरनेटचा वापर करूनच मोठे झालेत. त्यामुळे ते कोणत्याही प्रकारचा तणाव सहन करू शकत नाहीत. आणि समोरासमोर संभाषण करण्यात मत मांडण्यास कमी पडतात. पॅसिव्ह कंटेंट वापरणे, तासन् तास अंथरुणावर लोळत पडणे शारीरिक हालचाल न करणे, मानसिकदृष्ट्या स्वतःला सक्षम न बनवणे हे तुमच्यासाठी वाईट आहे. म्हणून मला वाटते की GenZ ने याबद्दल काळजी घेणे आवश्यक आहे, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

लडाखमध्ये ‘Gen-Z’चं रस्त्यावर उतरत उग्र आंदोलन; भाजप कार्यालय पेटवलं, पोलिसांवर दगडफेक, CRPF च्या गाडीची जाळपोळ