
हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाने जिंकलेला वन डे वर्ल्ड कप आज आठवणींत कोरला गेला असला तरी क्रिकेट कधीच थांबत नाही. व्यस्त आंतरराष्ट्रीय हंगामानंतर आता सगळे लक्ष वळले आहे ते हिंदुस्थानातील महिलांच्या सर्वोच्च टी-20 स्पर्धा असलेल्या महिला प्रीमियर लीगकडे (डब्ल्यूपीएल). हिंदुस्थानी महिला खेळाडू आता नव्या रणांगणात उतरायला सज्ज झाल्या आहेत. विश्वविजयी कामगिरीनंतर प्रथमच होत असलेला डब्ल्यूपीएलचा नवा हंगाम महिला क्रिकेटसाठी नवा अध्याय लिहिणार , हे निश्चित आहे.
शुक्रवार, 9 जानेवारी ते 5 फेब्रुवारीदरम्यान नवी मुंबई आणि वडोदरा येथे ही लीग रंगणार असून चार आठवडय़ांत 22 सामन्यांचा थरारक हायव्होल्टेज महिला क्रिकेट महोत्सव पाहायला मिळणार आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांनी जेतेपदाचा अनुभव घेतला आहे, मात्र दिल्ली पॅपिटल्स प्रत्येक वेळी अंतिम फेरी गाठूनही शेवटच्या टप्प्यावर अपयशी ठरली आहे. यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांनी चमक दाखवली असली तरी ट्रॉफी अजूनही त्यांच्या प्रतीक्षेत आहे.
यंदाचा हंगाम मागील पर्वांपेक्षा वेगळा ठरणार आहे. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा आणि शेफाली वर्मा ही नावे आता केवळ खेळाडू राहिलेली नसून राष्ट्रीय आयकॉन बनली आहेत. हिंदुस्थानी महिला संघ यंदा दबावाखाली नव्हे तर विश्वविजेत्यांच्या आत्मविश्वासासह मैदानात उतरणार आहे. 2007 नंतर आयपीएलने पुरुष क्रिकेटचं चित्र बदललं, तसाच बदल आता डब्ल्यूपीएलद्वारे महिला क्रिकेटमध्ये घडताना दिसतोय.
2026 मध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या महिला टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर डब्ल्यूपीएल ही तयारीची महत्त्वाची प्रयोगशाळा ठरणार आहे. मागील हंगामाने क्रांती गौड, काश्वी गौतम आणि श्री चरणी यांच्यासारख्या नव्या खेळाडूंना ओळख मिळवून दिली, तर यंदाही नवे चेहरे पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही लीग आता केवळ स्पर्धा न राहता भविष्यातील क्रिकेटपटू घडवणारी यंत्रणा बनली आहे.
या डब्ल्यूपीएल सामन्यांचे थेट प्रक्षेपण दुपारच्या सामन्यांसाठी 3.30 वाजता, तर सायंकाळच्या सामन्यांसाठी 7.30 वाजता होईल. लीग टप्प्यात अव्वल राहणारा संघ थेट अंतिम फेरीत पोहोचेल तर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या संघांमध्ये एलिमिनेटर सामना रंगेल. विजयी संघ जेतेपदासाठी झुंजेल.
महिला प्रीमियर लीग 2026 संघ
मुंबई इंडियन्स ः हरमनप्रीत कौर (कर्णधार), जी कमलिनी (यष्टिरक्षक), राहिला फिरदौस (यष्टिरक्षक), हेली मॅथ्यूज, अमनजोत कौर, अॅमीलिया केर, नॅट सिव्हर-ब्रंट, निकोला पॅरी, शबनिम इस्माईल, पूनम खेनमार, मिली इलिंगवर्थ, एस. सजाना, संस्पृती गुप्ता, सायका इशाक, क्रांती रेड्डी, त्रिवेणी वशिष्ठ.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ः स्मृती मनधाना, ऋचा घोष (यष्टिरक्षक), जॉर्जिया वॉल, गौतमी नाईक, ग्रेस हॅरिस, नादिन डी क्लर्प, पूजा वस्त्राकर, राधा यादव, श्रेयंका पाटील, अरुंधती रेड्डी, लॉरेन बेल, डी. हेमलता, सायली सातघरे, प्रेमा रावत, लिन्सी स्मिथ, पुमार प्रत्युशा. (एलिस पेरी वैयक्तिक कारणांमुळे बाहेर; तिच्या जागी सायली सातघरे)
दिल्ली पॅपिटल्स ः जेमिमा रॉड्रिग्स (कर्णधार), तान्या भाटिया (यष्टिरक्षक), एम. ममता (यष्टिरक्षक), लॉरा वोलवार्ट, शेफाली वर्मा, मरिझने पॅप, चिनेल हेन्री, लिझेल ली, एलाना किंग, लूसी हॅमिल्टन, स्नेह राणा, मिन्नू मणी, श्री चरणी, दिया यादव, निक्की प्रसाद, नंदिनी शर्मा (अॅनाबेल सदरलँड बाहेर; तिच्या जागी एलाना किंग)
यूपी वॉरियर्स ः मेग लॅनिंग (कर्णधार), श्वेता सेहरावत (यष्टिरक्षक), शिप्रा गिरी (यष्टिरक्षक), किरण नवगिरे, हरलीन देओल, फिबी लिचफिल्ड, दीप्ती शर्मा, डीएंड्रा डॉटिन, सोफी एकलस्टोन, आशा सोभना जॉय, शिखा पांडे, क्रांती गौड, प्रतिका रावल, सिमरन शेख, क्लो ट्रायोन, जी. त्रिशा, सुमन मीणा, चार्ली नॉट. (तारा नॉरिस बाहेर; तिच्या जागी चार्ली नॉट)
गुजरात जायंट्स ः अॅशले गार्डनर (कर्णधार), बेथ मूनी (यष्टिरक्षक), यस्तिका भाटिया (यष्टिरक्षक), शिवानी सिंह (यष्टिरक्षक), डॅनी वायट-हॉज, सोफी डिवाइन, जॉर्जिया वेअरहॅम, किम गार्थ, रेणुका सिंह ठापूर, तितास साधू, तनुजा पंवर, काश्वी गौतम, कनिका आहुजा, राजेश्वरी गायकवाड, भारती फुलमाळी, हॅपी पुमार, अनुष्का शर्मा, आयुषी सोनी.
महिला प्रीमियर लीग वेळापत्रक
दिनांक सामना वेळ स्टेडियम
9 जाने. मुंबई (एमआय) वि. बंगळुरू (आरसीबी) सायं. 7.30 डीवायपी स्टे.
10 जाने. यूपी (यूपीडब्ल्यू) वि. गुजरात (जीटी) दु. 3.00 डीवायपी स्टे.
10 जाने. मुंबई (एमआय) वि. दिल्ली (डीसी) सायं. 7.30 डीवायपी स्टे.
11 जाने. दिल्ली (डीसी) वि. गुजरात (जीटी) सायं. 7.30 डीवायपी स्टे.
12 जाने. बंगळुरू (आरसीबी) वि. यूपी (यूपीडब्ल्यू) सायं. 7.30 डीवायपी स्टे.
13 जाने. मुंबई (एमआय) वि. गुजरात (जीटी) सायं. 7.30 डीवायपी स्टे.
14 जाने. यूपी (यूपीडब्ल्यू) वि. दिल्ली (डीसी) सायं. 7.30 डीवायपी स्टे.
15 जाने. मुंबई (एमआय) वि. यूपी (यूपीडब्ल्यू) सायं. 7.30 डीवायपी स्टे.
16 जाने. बंगळुरू (आरसीबी) वि. गुजरात (जीटी) सायं. 7.30 डीवायपी स्टे.
17 जाने. यूपी (यूपीडब्ल्यू) वि. मुंबई (एमआय) दु. 3.00 डीवायपी स्टे.
17 जाने. दिल्ली (डीसी) वि. बंगळुरू (आरसीबी) सायं. 7.30 डीवायपी स्टे.
19जाने. गुजरात (जीटी) वि. बंगळुरू (आरसीबी) सायं. 7.30 बीसीए स्टे.
20 जाने. दिल्ली (डीसी) वि. मुंबई (एमआय) सायं. 7.30 बीसीए स्टे.
22 जाने. गुजरात (जीटी) वि. यूपी (यूपीडब्ल्यू) सायं. 7.30 बीसीए स्टे.
24 जाने. बंगळुरू (आरसीबी) वि. दिल्ली (डीसी) सायं. 7.30 बीसीए स्टे.
26 जाने. बंगळुरू (आरसीबी) वि. मुंबई (एमआय) सायं. 7.30 बीसीए स्टे.
27 जाने. गुजरात(जीटी) वि. दिल्ली (डीसी) सायं. 7.30 बीसीए स्टे.
29 जाने. यूपी (यूपीडब्ल्यू) वि. बंगळुरू (आरसीबी) सायं. 7.30 बीसीए स्टे.
30 जाने. गुजरात (जीटी) वि. मुंबई (एमआय) सायं. 7.30 बीसीए स्टे.
1 फेब्रु. दिल्ली (डीसी) वि. यूपी (यूपीडब्ल्यू) सायं. 7.30 बीसीए स्टे
3 फेब्रु. एलिमिनेटर सायं. 7.30 बीसीए स्टे.
5 फेब्रु. अंतिम सामना सायं. 7.30 बीसीए स्टे.


























































