
सामना प्रतिनिधी । मुंबई
शिवसेना उपनेते, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या संकल्पनेतून व यामिनी जाधव यांच्या सहकार्याने येत्या शनिवारी भायखळ्यात भव्यदिव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान येथे या स्पर्धेचा थरार तमाम मुंबईकरांना ‘याचि देही याचि डोळा’ पाहता येणार आहे. या स्पर्धेत ‘महाराष्ट्र केसरी’ बाला रफीक, ‘हरयाणा केसरी’ मोहितकुमार यांच्यासह स्टार खेळाडूंचा सहभाग असणार आहे. या स्पर्धेला मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर उपस्थित राहणार आहेत. तसेच भायखळा समन्वयक बबन गावकर, विधानसभा संघटक विजय लिपारे, उपविभागप्रमुख राम सावंत, विजय कामतेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेत आहेत.




























































