हर्षवर्धन, शैलेशवर मदार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय ग्रीको रोमन निवड चाचणी कुस्ती स्पर्धा पार पडली. कात्रज येथील स्वर्गीय मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रात पार पडलेल्या या स्पर्धेतून वरिष्ठ राष्ट्रीय ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात आला. विद्यमान महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर व उपमहाराष्ट्र केसरी शैलेश शेळके यांच्याकडून महाराष्ट्राला राष्ट्रीय स्पर्धेत पदकांची अपेक्षा आहे. येत्या 20 व 21 फेब्रुवारीला पगवारा (पंजाब) येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी या संघाची घोषणा केली.
निवड झालेला संघ

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर

55 किलो – अभिजित पाटील,
60 किलो – सद्दाम शेख,
63 किलो – गोविंद यादव,
67 किलो – प्रीतम खोत,
72 किलो – समीर पाटील,
77 किलो – शिवाजी पाटील,
82 किलो – तानाजी वीरकर,
87 किलो – अमोल मुंढे,
97 किलो – शैलेश शेळके,
130 किलो – हर्षवर्धन सदगीर.