सेक्रेड गेम्समध्ये तो बॉम्ब फुटतो की नाही? लेखक वरुण ग्रोवरने दिले हे उत्तर

1728

सेक्रेड गेम्सचे दुसरे पर्व प्रदर्शित झाले. प्रेक्षकांनी त्याच्यावर अक्षरशः उड्या मारल्या होत्या. परंतु शेवटच्या एपिसोडमुळे प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न उभा राहिला. तो हा की अखेर अण्वस्त्र बॉम्ब फुटतो की नाही? सरताज मुंबईला वाचवण्यात यश मिळवतो की नाही? त्यावर सीरीजचे लेखक वरुण ग्रोवर यांनी भाष्य केले आहे.

द लल्लनटॉप या आजतच्या वेब प्लॅटफॉर्मच्या एका मुलाखातीत वरुण ग्रोवर यांनी सेक्रेड गेम्सच्या शेवट करण्याविषयी चर्चा केली आहे. सेक्रेड गेम्सच्या दुसर्‍या पर्वाचे लेखन करताना मुंबईतील हल्ला यशस्वी होतो असे वरुण आणि लेखक मंडळींनी ठरवले होते. जगात एवढ्या वाईट गोष्टी घडत आहेत तर हे जग नष्टच झाले पाहिजे असे मत लेखकांचे झाले पाहिजे. आणि जग नष्ट झाले पाहिजे ते एका झटक्यात. अनेक वर्ष युद्ध सुरू आहे आणि मग त्याचा अंत होतो असा शेवत लेखकांना नको होता. म्हणून तो हल्ला यशस्वी होतो अशा शेवटा लेखकांनी कथेत केला होता. हा शेवट दिग्दर्शक अनुराग कश्यम आणि विक्रामादित्य मोटवाणे आणि नीरज घ्यावान यांना पसंत पडला नाही. तसेच नेटफ्लिकच्या टीमलाही हा शेवट रुचला नाही. अखेर लेखकांनी हा निर्णय प्रेक्षकांवर देण्याचा ठरवला. वरुण ग्रोवर म्हणाले की तुम्ही जर पुन्हा ती सीरीज पाहिली की तुम्हाला कळेल की तो स्फोट झाला की नाही.

सामनाच्या वाचकांसाठी आम्ही हे उत्तर आधीच शोधले आहे. तो हल्ला अयशस्वी होतो, सरताज तो बॉम्ब निकामी करण्यात यशस्वी ठरतो हे सांगितले होते. तो लेख वाचण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

सेक्रेड गेम्सचा तिसरा सीजन येणार का? वाचा सविस्तर

आपली प्रतिक्रिया द्या