सेक्रेड गेम्सचा तिसरा सीजन येणार का? वाचा सविस्तर

3870

Spoiler Alert

बहुप्रतिक्षित सेक्रेड गेम्स या नेटफ्लिक्सवरील दुसरा सीजन प्रदर्शित झाला आहे. या सीजन बद्दल प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.  आठ एपिसोड असलेल्या या सीजनमध्ये शेवटच्या भागामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यापैकी शाहीद खान आणि सरताज खानचे नाते काय? मॅल्कमने आत्महत्या का केली? बात्या मरते की जिवंत राहते आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सरताज सिंह अणुबॉम्ब स्फोटापासून शहराला वाचवतो की नाही? म्हणजेच सेक्रेड गेम्सचा पुढचा सीजन असणार की नाही हा महत्त्वाचा प्रश्न प्रेक्षकांसमोर आहे.

त्यापैकी पुढचा सीजन असणार आहे की नाही याचे प्राथमिकदृष्ट्या उत्तर दोन पद्धतीने होकारार्थी देता येईल. त्याचे पहिले कारण असे की, जर आपण मालिकेनुसार  विचार केला तर शाहीद खान आणि सरताज सिंह यांनी काढलेले पॅटर्न हे वेगवेगळे आहेत. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे हा अण्वस्त्र हल्ल्याचा बॉम्ब आहे ऍन्ड्रॉईड फोन नाही. म्हणून ज्या पॅटर्नमुळे बॉम्ब ऍक्टिव्ह झाला आहे त्यामुळेच तो डीऍक्टिव्ह होईल असे नाही. बॉम्ब डीऍक्टिव्ह करण्यासाठी गुरुजींनी केलेल्या मार्गदर्शनानुसर दुसरा पॅटर्न ठेवला असावा.

sacred-games-pattern

दुसरा महत्त्वाचा संदर्भ म्हणजे सैफ अली खान याने सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सीजनच्या प्रदर्शनाच्या दोन महिन्यापूर्वी डीएनए या वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. त्यानुसार सेक्रेड गेम्स ही सीरीज चार सीजनमध्ये प्रदर्शित होईल असे सैफने म्हटले होते. 

सैफ म्हणाला होता की “सेक्रेड गेम्स ही कादंबरी एक हजार पानांची आहे. त्यावर आम्ही चार सीजनमध्ये ही मालिका निर्माण करणार आहोत. आतापर्यंत या कादंबरीचा फक्त 25 भागावर काम केले आहे. प्रत्येक सीजनमध्ये 8 एपिसोड असतील. म्हणजेच 32 भागांचे चार सीजन असतील.”  प्रत्येक वर्षी मालिकेचा एक सीजन प्रदर्शित होईल अशी माहितीही त्याने यावेळी दिली होती.

तिसर्‍या भागात काय दाखवणार?

तिसर्‍या भागात अनेक प्रश्नांची उकल होईल असा अंदाज आहे. मुंबईवर संकट आहे असे पहिल्या भागात म्हटले होते. नेमके संकट काय होते आणि ते कसे निर्माण झाले याची उत्तरं दुसर्‍या सीजन मध्ये मिळाली आहेत. आता दुसर्‍या सीजनमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाली आहेत त्यापैकी पहिला प्रश्न म्हणजे सरताज सिंह शहराला वाचवतो की नाही? दुसर प्रश्न म्हणजे शाहीद खान आणि सरताज चे नेमके नाते काय? तसेच गुरुजींचे अनुयायी नेमके काय करणार या प्रश्नांची उत्तरे पुढील भागात पहायला मिळतील अशी आशा आहे.   

आपली प्रतिक्रिया द्या