असं झालं तर…चुकीच्या यूपीआय आयडीवर पैसे पाठवले तर…

बरेचदा लोक घाई किंवा निष्काळजीपणामुळे चुकीच्या यूपीआय आयडीवर पैसे ट्रान्सफर करतात. त्यानंतर त्यांना पैसे परत मिळण्याची चिंता वाटू लागते.

तुम्ही चुकून दुसऱयाच्या यूपीआय आयडीवर पैसे पाठवल्यास पैसे परत मिळवण्यासाठी प्रथम ज्या व्यक्तीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले गेले आहेत त्यांच्याशी संपर्क साधा.

जर त्याने पैसे परत केले नाहीत तर ज्याद्वारे हस्तांतरण केले गेले होते त्या यूपीआय अॅपच्या ग्राहक सेवा क्रमांकावर त्वरित संपर्क साधा आणि आपली तक्रार नोंदवा.

अॅपच्या ग्राहक सेवा केंद्राद्वारे समस्येचे निराकरण न झाल्यास एनपीसीआय पोर्टलवर तक्रार करा. त्यांना व्यवहाराचे तपशील आणि पुरावे द्या. ते या प्रकरणाची चौकशी करतील.

व्यवहारात चूक झाली असेल तर लगेच तक्रार करावी. व्यवहार झाल्यानंतर 48 तासांच्या आत तक्रार करणे आवश्यक आहे. यानंतर तक्रार केल्यास पैसे परत मिळण्याची शाश्वती नसते.