WTC Final India vs New Zealand सामन्यापूर्वी पावसाला सुरुवात, सामना वेळेत सुरू होण्यावर प्रश्नचिन्ह

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित हिंदुस्थान विरूद्ध न्यूझीलंड कसोटी सामना आजपासून सुरू होणार आहे. मात्र पाऊस क्रिकेटरसिकांच्या आनंदावर विरजण घालण्याची शक्यता आहे. पावसामुळे सामना वेळेत सुरू होईल की नाही याबाबत सध्या काहीही सांगणं अवघड झालं आहे. गुरुवारी रात्रीपासून मैदान परिसरात पाऊस पडत असून बातमी प्रसिद्ध होतेवेळीही तिथे पावसाची रिमझिम सुरू होती. वेदर डॉट कॉम या हवामानविषयक वेबसाईटने उद्याही या भागात रिमझिम पावसाची शक्यता वर्तवली आहे.

हिंदुस्थानी संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जाडेजा याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. मैदानाच्या बाल्कनीत उभा राहून त्याने हा फोटो काढला आहे. यामध्ये तो कॉफी पीत पावसाचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठीच्या सामन्याला 3 वाजेपासून सुरुवात होणार असून 2.30 वाजता नाणेफेक होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या