WTC : चौथा दिवसही पावसाने वाया

हिंदुस्थान-न्यूझीलंड यांच्यामधील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनल लढतीवर पावसाने पाणी फेरले आहे. दोन देशांमधील लढतीचा चौथा दिवसही वाया गेला. सोमवारी एकही चेंडू टाकला गेला नाही. आतापर्यंत दोन डावही पूर्ण झालेले नाहीत. आता या कसोटीचे दोन दिवस (एक राखीव) बाकी आहेत. ही लढत ड्रॉ होण्याचे संकेत मिळाले असून असे झाल्यास दोन्ही संघ विजेते ठरतील.

आपली प्रतिक्रिया द्या