जम्मू कश्मीरमध्ये पाकड्यांचा गोळीबार; दोन नागरिकांचा मृत्यू

324
army_jawan
फाईल फोटो

जम्मू कश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून गेल्या 24 तासांपासून गोळीबार करण्यात येत आहे. निवासी भागात आणि लष्करी चौक्यांना लक्ष्य करून गोळीबार करण्यात येत आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानकडून मंगळवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास पूंछ जिल्ह्यातील शाहपूर आणि केरनी या दोन सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानने डागलेल्या 182 एमएमच्या मोर्टारमुळे अनेक घरांचे नुकसान झाल्याची माहिती संरक्षण विभागाच्या प्रवक्तांनी दिली आहे.

पाकिस्तानच्या गोळीबारात सीमाभागात राहणाऱ्या दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 7 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असून तसेच 24 तासांपासून गोळीबार सुरू असल्याने सीमाभागात तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे निवासी भागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना लष्कराने दिल्या आहेत. तसेच सुरक्षा दलांना पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या