108 MP कॅमेराचा Mi Mix Alpha स्मार्टफोन लॉन्च, वाचा खास फिचर्स…

3914

जगभरामध्ये रोज नवनवीन स्मार्टफोन लॉन्च होतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध कंपन्या इतरांपेक्षा वेगळे फिचर्स देण्याचा प्रयत्न करतात. आता चीनची नावाजलेली स्मार्टफोन कंपनी शाओमी (Xiaomi) ने Mi Mix Alpha हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे फोटो काढण्याची आवड असणाऱ्यांसाठी 108 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

Mi Mix Alpha या स्मार्टफोनल वॉटरफॉल डिस्प्ले (Waterfall Display) देण्यात आला आहे. तसेच पूर्णपणे कर्व्ड एजेस देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनला 108 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे, परंतु सेल्फी कॅमेरा देण्यात आलेला नाही. त्यामुळे सेल्फी काढण्यासाठी रियर कॅमेराचा वापर करावा लागणार आहे. विशेष म्हणजे यासोबत डिस्प्लेही फिरवता येणार असल्याने त्यात पाहून तुम्ही आपला सेल्फी काढू शकणार आहेत.

xiaomi-mi-mix-alpha

या स्मार्टफोनची विक्री या वर्षाच्या शेवटी सुरु करण्यात येणार आहे. याची प्राथमिक किंमत जवळपास 19999 युआन अर्थात 1.98 लाख रुपयांपासून पुढे असणार आहे.

वाचा अन्य काही फिचर्स –
108 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा
कमी प्रकाशात फोटोग्राफीसाठी सर्वोत्तम कॅमेरा
Qualcomm Snapdragon 855+ प्रोसेसर
5G कनेक्टिविटी सपोर्ट
12GB रॅम आणि 512GB ची इंटर्नल स्टोरेज
4,050mAh बॅटरी, 40W फास्ट चार्जिंग सपोर्ट

आपली प्रतिक्रिया द्या