
जागतिक विकलांग दिनानिमित्त 1 ते 3 डिसेंबरमध्ये लातूर येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय अंध क्रिकेट स्पर्धेत साखरपा येथे राहणारा यश प्रकाश देवरुखकर याने सहभाग घेतला. उपविजेत्या महाराष्ट्र संघात तो खेळाडू होता. चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाला थोड्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता.
2017 ला या अंध क्रिकेट प्रकारच्या खेळाचा श्रीगणेशा केल्याचे यशने सांगितले. त्याला यासाठी सुरेखा जोशी, संदिप नलावडे ,खोपकर,जैन सर यांचे मार्गदर्शन लाभले. या आधी खेड, नागपूर,रत्नागिरी येथील स्पर्धेत तो सहभागी झाला होता.तो संघात उत्कृष्ठ फलंदाज म्हणून ओळखला जातो.रत्नागिरी गोगटे कॉलेज येथे कला विभागात यश शिक्षण घेत आहे. लहानपणापासून असलेल्या अंधत्वावर मात करून जिद्दीने खेळ व शिक्षण यामध्ये तो प्रावीण्य मिळवत आहे. बाबासाहेब कोलते ज्युनियर कॉलेजमध्ये १बारावीत त्याने 75% गुण मिळवले होते.
प्राथमिक शिक्षण त्याने कोल्हापूरमध्ये पूर्ण केले आहे. पुढील सामने त्याचे पश्चिम बंगाल या ठिकाणी होणार आहेत. त्यासाठी तो सराव करीत आहे. मात्र, यावेळी बोलताना तो म्हणाला की, खेळासाठी पुरेस मैदान, साहित्य उपलब्ध होत नसते. यासाठी त्याने पाठपुरावा झाला पाहिजे असे त्याने सांगितले. भविष्यात आपल्याला देशाच्या संघासाठी खेळायचे असल्याचे सांगितले. वडील प्रकाश देवरुखकर व आई प्राची देवरुखकर सर्व कुटुंबीय व मित्रमंडळीचे सहकार्य मिळत असल्याचे त्याने सांगितले. भारतीय अंध क्रिकेट संघात दमदार कामगिरी करण्याची जिद्द असल्याचे त्याने सांगितले. या यशामुळए त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.





























































