यशोधन शाळेचा १०० टक्के निकाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शास्त्रीनगर येथील यशोधन एज्युकेशन ट्रस्ट संचालित माध्यमिक शाळेच्या इंग्रजी व मराठी माध्यमांचा निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेने गेल्या १६ वर्षांपासून शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. मराठी माध्यमातील विनायक पवार याने ९३.४० टक्के गुण मिळवत शाळेत पहिला क्रमांक पटकावला आहे तर हर्षद लोहार याने ८६.४० टक्के गुण मिळवत द्वितीय आणि स्नेहल पाटें हिने ८५.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला आहे. तर इंग्रजी माध्यमातील आकांक्षा यादव हिने ९३ टक्के गुण मिळवत पहिला, साहिल गुप्ता याने ९१ टक्के गुण मिळवत द्वितीय आणि रोशनी शेंडगे हिने ८९.२० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ राऊत, सचिव डी. पी. खातू, मुख्याध्यापिका प्रतिभा अहिरे व श्रुती सावंत, पर्यवेक्षक सोमनाथ भुंडेरे यांच्यासह शाळेतील शिक्षकांचे या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले.