विशाखा समितीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्क फोर्स नेमणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील सर्व कार्यालये, कारखाने, कंपनी, संघटित असंटित क्षेत्रामध्ये कामाच्या ठिकाणी होणाऱया महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारींची वेळीच दखल घेण्यासाठी विशाखा समिती स्थापन करणे सक्तीचे करण्यात आले आहे. या समितीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्क पर्ह्स नेमण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले

कामाच्या ठिकाणी महिलांची छळवणूक, अत्याचार रोखण्यासाठी असलेल्या विशाखा समितीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बैठक झाली. महिलांचा लैंगिक छळ केल्याच्या घटना घडतात. या छळापासून संरक्षण व्हावे, यासाठी आलेल्या तक्रारींची वेळीच दखल घेणे गरजेचे असून सर्व विभागांनी नियमानुसार योग्य कार्यवाही करावी, असे अॅड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

तक्रारींची चौकीशी करण्यासाठी सर्व जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱयांना सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व जिह्यांमध्ये स्थानिक स्तरावर तक्रार समिती स्थापन केली आहे. प्रत्येक जिह्याच्या उपजिल्हाधिकाऱयांनी या नियोजनासाठी एक समन्वय अधिकारी निवडावा व त्यांच्या कार्यक्षेत्रातील लैंगिक छळाच्या तक्रारी प्राप्त करून संबंधित स्थानिक तक्रार समितीकडे पाठवाव्यात. याबाबतचा अहवाल संबंधित जिल्हाधिकारी यांना सादर करून त्यांनी तो अहवाल महिला व बालविकास विभागास प्रत्येक वर्षाच्या 30 एप्रिलपूर्वी सादर करावा असे निर्देशही त्यांनी दिले.

विशाखा समिती अनिवार्य

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 अंतर्गत विशाखा समिती नेमणे अनिवार्य आहे. शासकीय तसेच खासगी कार्यालयात विशाखा समितीच्या माध्यमातून महिलांना न्याय मिळावा यासाठी कठोर पावले उचलावीत तसेच अमंलबजावणाकरिता टास्क पर्ह्स स्थापन करावा, असे आदेश यावेळी अॅड. यशोमती ठाकूर यांनी दिले.