…तर पालकमंत्र्यांना बांगड्यांचा आहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नगर

चौंडी येथील सभेमध्ये धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांवर २० जून पर्यंत गुन्हे मागे घेतले नाही तर यशवंत सेनेच्या महिला आघाडीच्या वतीने पालकमंत्री राम शिंदे यांना बांगड्यांचा आहेर देण्यात येईल असा इशार यशवंत सेनेचे सरसेनापती महादेव गडदे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिला.

यावेळी गडदे म्हणाले की, ३१ मे रोजी चौंडे येथे अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीचा कार्यक्रम हा भाजप पुरस्कृत कार्यक्रम होता. धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी त्या ठिकाणी घोषणाबाजी केली व आपल्या मागण्या या ठिकाणी मांडल्या. पोलिसांनी बळाचा वापर करुन त्यांना अमानुष मारहाण केली. ५५ जणांना अटक करुन त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले. आत्तापर्यंत ३५ जणांना जामिन मंजूर झाला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये उच्चशिक्षीत असलेले डॉक्टर दोन अभियंते तसेच एक पोलिस परिक्षा उत्तीर्ण झालेला असे या आंदोलनात सहभागी झाले होते. पूर्वग्रह दुषित धरुन त्यांच्यावर पालकमंत्र्यांनी रोष व्यक्तकरुन गुन्हे दाखल करण्यास सांगितले. वास्तविक पाहता सरकारने पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण दिले जाईल अशी घोषणा केली होती मात्र, चार वर्षामध्ये एकही मागणी मान्य झाली नाही. चौंडीमध्ये जो उद्रेक झाला तो अन्यायाच्या विरोधातला होता. वास्तविक पाहता सरकारने हि गोष्ट गांभीर्याने घेतली नाही. आगामी काळामध्येसुध्दा या पेक्षाही तिव्र आंदोलन यशवंत सेनेच्या माध्यमातून छेडणार असल्याचा इशारा यावेळी गडदे यांनी दिला.

जिल्हयाचे पालकमंत्री यांनीच उलट आरक्षणाबाबत आंदोलन तीव्र करा असा संदेश एक महिन्यापूर्वीच दिला होता. बहुधा ते विसरले का, तर कार्यकर्त्यांनी आंदोलन केले तर गैर काय न्याय हक्कासाठी अनेक संघटना रस्त्यावर उतरता, आंदोलने करतात त्यांना असेच अमानुष मारहाण करतात का ? असे विचारणा केली. या सरकारला आता जाग आणण्यासाठी सर्व समाज एकत्रितपणे होवून लढा उभारणार आहे त्याची किंमत या भाजप सरकरला निश्‍चितपणे मोजावल लागणार आहे असा इशाराही गडदे यांनी दिला. मी पालकमंत्र्यांना फोन करायला गेलो, पण त्यांनी एकही फोन घेतला आहे. पडद्यामागुन ते सूत्र हलविता असा आरोपही त्यांनी यावेळी केला. आमचे वैयक्तीक त्यांच्याशी भांडण नाही. पण आगामी काळात आता आंदोलन पेटवणार असून समाज भाजपा सोबत राहणार नाही हे ही तेवढेच महत्त्वाचे असल्याचे गडदे म्हणाले.