मालखेड येथे खाद्य तेलाचा टँकर पलटी; तेल नेण्यासाठी नागरिकांची झुंबड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नेर तालुक्यातील मालखेड येथे रविवारी सकाळच्या सुमारास खाद्यतेलाचा टँकर पलटी झाल्याची घटना घडली. यानंतर खाली तेल सांडत असल्याचे बघून नागरिकांनी आपल्या घरी तेल नेण्यासाठी एकच गर्दी केली होती. टँकर उलटल्याने रस्त्यावरील वाहतूक सुमारे दोन तास विस्कळीत झाली होती. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे. चालकाला मदत करण्याचे सोडुन नागरिक जे दिसेल त्या भांड्यात तेल घेवुन जातांना दिसले यावरुन माणुसकी कुठे गेली हा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, घटना स्थळाचा व्हिडिओही समोर आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)