येदियुरप्पांचे आज भवितव्य ठरणार, भाजपची वाढली धडधड

640

कर्नाटकातील बी. एस. येदियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेत राहणार की जाणार याचे उत्तर सोमवारी पोटनिवडणुकीच्या निकालातून मिळणार आहे. काँग्रेस आणि जेडीएसच्या 17 आमदारांच्या बंडखोरीमुळे भाजपने सत्तेचे स्वप्न पूर्ण केले होते. आता 15 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालावर या सत्तेचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे येदियुरप्पा सरकारची धडधड चांगलीच वाढली आहे.

काँग्रेस-जेडीएसच्या 17 आमदारांच्या बंडखोरीमुळे एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार जुलैमध्ये पडले व भाजपने येदियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली आपले सरकार स्थापन केले. नंतर काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोर आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवले. त्यांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवतानाच 15 जागांसाठी पोटनिवडणुका घेण्याचा आदेश दिला. त्यानुसार 5 डिसेंबरला झालेल्या मतदानाचा सोमवारी निकाल लागणार आहे. ही निवडणूक येदियुरप्पा सरकारला सत्तेत राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण भाजपला बहुमत कायम राखण्यासाठी यातील किमान 6 जागांवर विजय मिळवणे गरजेचा आहे. या जागा जिंकता न आल्यास येदियुरप्पा सरकार गडगडणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या