पिवळे दात चमकदार बनवायचे आहेत? तर करा ‘हे’ घरगुती उपाय

चमकदार सफेद दात खूप आकर्षक आणि निरोगी दिसतात. दातांमध्ये पिवळेपणा तुमच्या चेहर्‍याची सुंदरता कमी करू शकतो. दात पिवळे पडण्याचे भरपूर कारणे असू शकतात. ज्यात योग्य पद्धतीने दात न घासणे, चहा आणि कॉफीचे अतिसेवन, दारू आणि धूम्रपान आणि कोल्ड्रिंक्स पिणे. अश्या काही सवयीमुळे दात पिवळे पडू शकतात. आज आम्ही तुम्हाला पिवळे दात घरगुती उपाय करून सफेद चमकदार कसे करता येतील याबद्दल सांगणार आहोत.

केळ्याच्या साली-

केळ्याच्या सालीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मॅगनीझ असते. ते ब्लिचिंग एजंट असल्यामुळे तुमच्या दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी केळ्याची सालं उपयोगी पडते. केळ खाल्ल्यानंतर त्याची साल न फेकता ती साल तुम्ही तुमच्या दातांना घासा, असे केल्यामुळे तुमच्या दातांचा पिवळेपणा जाण्यास मदत होईल. वर म्हटल्याप्रमाणे सालीमध्ये असलेले पोटॅशिअम, मॅग्नेशिअम तुमच्या दातांचा पिवळेपणा घालवण्यास मदत करते. केळ्यांच्या सालीचा वापर तुम्ही आठवड्यातून दोनवेळा केला तरी चालू शकेल. कारण याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

स्ट्रॉबेरी –

ज्या प्रमाणे केळ्याच्या सालीमध्ये अॅसिडीक गुणधर्म असतात अगदी त्याचप्रमाणे स्ट्रॉबेरीमध्येही काही अॅसिडीक गुणधर्म असतात. स्ट्रॉबेरीमध्ये मॅलिक अॅसिड आणि टूथ व्हाईटनिंग एजंट आहेत. त्यामुळे स्ट्रॉबेरीचा उपयोगही दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी केला जातो. स्ट्रॉबेरी हाताने क्रश करुन त्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा घालून एक छोटा ब्रश घेऊन टुथपेस्टचा वापर करतात अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचे दात घासायचे आहेत. असे करताना तुम्हाला थोडी चुरचूर जाणवेल. पण जर तुम्हाला जास्त अॅसिडीक रिअॅक्शन नको असेल तर तुम्ही यातील सोडा वगळू शकता आणि नुसताच स्ट्रॉबेरीचा क्रश वापरु शकता.

लिंबाची फोड आणि खाण्याचा सोडा –

लिंबू ही ब्लचिंग एजंट म्हणून ओळखले जाते. ज्याप्रमाणे ते तुमच्या त्वचेवर काम करते अगदी त्याच पद्धतीने ते तुमच्या दातांचा पिवळेपणा घालवण्यास मदत करु शकते. लिंबामध्ये सायट्रिक असते. ज्यामुळे तुमच्या दातांचा पिवळेपणा कमी होऊ शकतो. त्यामुळे एक लिंबाची फोड घेऊन त्यावर खाण्याचा सोडा घाला आणि ही फोड दातावर चोळा आणि अगदी काहीच वेळ ठेवून तुम्ही गुळण्या करा. (लिंबाचा अति वापर तुमच्यासाठी चांगला नाही. लिंबामध्ये असलेले सायट्रिक अॅसिड तुमच्या दातांसाठी चांगले नाही. त्याच्या अति वापरामुळे तुमच्या दातांवरील इनॅमल कमी होते आणि त्यामुळे तुमचे दात नाजूक होतात. जे तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याचा वापर अगदी योग्य प्रमाणात करायला हवा)

बेकिंग सोडा आणि ब्रश –

आतापर्यंत आपण पाहिलेच आहे की, बेकिंग सोडाचा वापर दातांसाठी केला जातो. तुम्ही थेट बेकिंग सोड्याचा वापर दातांसाठी करु शकता. बेकिंग सोडा आणि पाणी मिसळून त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या थेट दातांवर करा. तुमच्या दातांचे डाग निघून जातील. बेकिंग सोड्याचा वापर करताना थोडे जपून राहा.

अननस –

दातांचा पिवळेपणा तुमच्या दातांमध्ये साचलेल्या प्लाकमुळे अधिक दिसू लागतो. तुमच्या दातांच्या आजुबाजूला जर पिवळा थर साचला असेल तर त्याला प्लाक असे म्हणतात. अननसमध्ये असलेले एन्झाइम्स तुमच्या दातांचा पिवळेपणा कमी करण्यास मदत करतात. अननसची फोड घेऊन तुम्ही तुमच्या दातांवर चोळा. यामुळे तुमच्या दातांवरील पिवळेपणा कमी झालेला दिसेल. याशिवाय तुमच्या दातांवरील प्लाक निघण्यासही तुम्हाला मदत मिळेल.

कडुनिंब-

तुमच्या दातांच्या समस्या कमी करण्यासाठी कडुनिंब हे उत्तम आहे. कडुनिंबामुळे तुमच्या दातांमधील किड, दातांचा पिवळेपणा आणि दातांच्या इतर समस्या कमी होण्यास मदत मिळते. हल्ली बाजारात कडुनिंबाची पावडर मिळते. तुम्ही कडुनिंबाची पावडर घेऊन तुमचे दात ब्रश करु शकता. तुमच्या दातांचा रगं उजळण्यासोबतच तुमच्या दातांच्या इतर समस्याही त्यामुळे दूर होतील. कडुनिंबाचा वापर करण्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

काळे मनुके –

काळे मनुके तुमचे दात स्वच्छ करण्यास मदत करते. जर तुम्ही काळे मनुके चघळले तर या मनुक्यांमधून बाहेर पडणारे अॅसिडीक गुणधर्म तुमच्या दातांना स्वच्छ करण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्ही काळे मनुके अगद मूठभर खायला काहीच हरकत नाही. तुम्ही जर मनुके खाणार असाल तर तुम्ही ते उघडून तुमच्या दातांनाही चोळू शकता. त्यामुळे तुमच्या दातांच्या इतर समस्याही कमी होतील.

संत्र्याच्या साली-

दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी तुम्ही संत्र्याच्या सालींचा देखील उपयोग करु शकता. संत्र्यांच्या सालीमध्ये सायट्रीक अॅसिड असते. त्याचा उपयोग तुम्हाला दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी होऊ शकतो. जर तुम्ही संत्र्याची पावडर तयार करुन ठेवली तर तुम्ही त्याचा उपयोग आठवड्यातून दोनदा करु शकता. तुम्ही तुमच्या ब्रश करण्याच्यावेळी त्याचा वापर केला तरी चालू शकेल. पण सायट्रीक अॅसिड असल्यामुळे त्याचा वापर थोडा बेताने करा.

कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना धीरज शिंदे यांनी ही माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या