कवडीमोल भाव मिळाल्याने भाजीपाल्यावर फिरवला नांगर, येवल्यातील शेतकऱयाला लॉकडाऊनचा फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या प्रादुर्भावात आता शेतकरीही भरडला जाऊ लागला आहे. संपूर्ण देश लॉकडाऊन असताना शेतमालाचे भाव कमी होऊ लागले आहेत. एक एकरात केलेले वांगे आणि कोबीला मातीमोल भाव खरेदीदारांनी दिल्यानंतर वैतागलेल्या शेतकऱयाने शेतात नांगर फिरवल्याची घटना येवल्यातील आडगाव चोथवा येथे घडली.

काकासाहेब शिंदे यांनी आपल्या एक एकर शेतात कोबी आणि वांग्याचे पीक घेतले होते. 50 ते 60 हजार रुपये खर्च या भाजीपाला पिकांवर शिंदे यांनी केला होता. मात्र कोरोना विषाणूची साथ आल्यानंतर देशात लॉक डाऊन जाहीर झाले. याचा फटका द्राक्षे पिकासह जिह्यात भाजीपाला पिकांनाही बसला. कोबी आणि वांग्याला मागणी नसल्याने घाऊक खरेदीदार मातीमोल भावाने मागणी करत असल्याने उत्पादन खर्च तर दूर वाहतूक खर्च निघणेही दुरापास्त झाले आहे.