हेडगेवार यांचा धडा पाठ्यपुस्तकातून वगळला, पुन्हा वाद चिघळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Madhu-Bangarappa,-Karnataka

कर्नाटकात सत्तांतर झाल्यानंतर आता त्याचे पडसाद विविध क्षेत्रांवर पाहायला मिळत आहेत. कर्नाटकात भाजपचं सरकार सत्तेत असताना त्यांनी पाठ्य पुस्तकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) संस्थापक हेडगेवार यांचा धडा आणला होता. आता सिद्धरमय्या यांच्या नेतृत्त्वात काँग्रेस सत्तेत आल्यानंतर त्यांच्या सरकारनं हेडगेवार यांच्यावरील धडा पाठ्य पुस्तकातून वगळला आहे. कर्नाटकचे शिक्षण मंत्री मधू बांगरप्पा यांनी यासंदर्भात माहिती दिली.

शिक्षणमंत्री म्हणाले, ‘अभ्यासक्रमातून के. बी. हेडगेवार यांचा धडा वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधीच्या (भाजप) सरकारने जे काही बदल केले होते ते परत मागे घेण्यात आलं आहे. इतकंच नाही तर भाजपच्या सत्तेच्या आधी आमची सत्ता असताना निश्चित करण्यात आलेला अभ्यासक्रम पुन्हा शिक्षणात समाविष्ट करण्यात आला आहे.’