योग तपश्चर्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स तु दीर्घकाल नैरन्तर्य सत्कारसेवितों दृद्धभूमिः

अर्थात कुठल्याही गोष्टींमध्ये आपल्याला संकल्पित, अपेक्षित यश मिळवण्यासाठी ती गोष्ट दीर्घकाळपर्यंत केली पाहिजे. केवळ दीर्घकाळपर्यंत करून उपयोगाची नाही, तर त्यामध्ये निरंतरता किंवा सातत्य पाहिजे आणि ती गोष्ट केवळ निरंतरता किंवा दीर्घकाळ करूनही उपयोगाची नाही, तर त्यामागे आपली श्रद्धा पाहिजे. ती एका चिकाटीने, जिद्दीने आणि श्रद्धेने आपण केली पाहिजे. तरच त्या गोष्टींमध्ये आपल्याला यश मिळू शकते.

हे योगसूत्र आपण मागील लेखात पाहिले. एखाद्या कामाला सुरुवात केल्यानंतर त्यात यश येत नाही म्हणून थांबू नये, खचून जाऊ नये. जिद्दीने प्रयत्न करतच राहावेत. उद्दिष्ट साध्य होईपर्यंत चिकाटीने केलेले प्रयत्न, अभ्यास म्हणजेच साधना होय.

हे सूत्र हे जरी योगदर्शनातील असले तरी ते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला लागू पडते. आसनांचा अभ्यास करताना आपल्यामध्ये दुसऱया इतकी लवचिकता नाही किंवा दुसऱया इतके आसन आपण चांगल्या प्रकारे करू शकत नाही म्हणून निराश होऊ नये. प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व वेगळे असते, शरीरयष्टी वेगळी असते आणि प्रत्येकाच्या शरीरातील लवचिकता वेगवेगळ्या प्रमाणात असते. आपण नियमित प्रयत्न चालू ठेवावा. एखादे आसन आपण परिपूर्ण करू शकत नसलो तरी रोज अभ्यास केल्याने त्या आसनाचा शरीरावर अपेक्षित असलेला परिणाम हा आपल्याला मिळतो.

काही हरकत नाही. थोडा अंतराय पडला तरी त्या अंतरायानंतर पुनश्च कामाला प्रारंभ करावा. ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे!’ यालाच साधना म्हणतात. कुठल्याही विद्याभ्यासाच्या शाखेमध्ये आपल्याला पदवीधर व्हायचे असेल तर सध्याच्या काळामध्ये कमीत कमी पंधरा वर्षांचा अभ्यास करावा लागतो. पूर्वीच्या काळामध्ये हा अभ्यास बारा वर्षांच्या कालावधीचा होता आणि म्हणून बारा वर्षांच्या कालावधीला ‘तप’ असे म्हटले आहे. कुठलीही साधना, कुठलेही कार्य आपण बारा वर्षे सातत्याने आणि श्रद्धेने करत असू तर त्याला तपश्चर्या म्हणतात. या तपश्चर्येने आपल्या शरीरामध्ये आणि मनामध्ये एक ऊर्जा, उत्साह, ओज निर्माण होते.

प्रयत्ने वाळूचे कण रगडता…
निरंतर प्रयत्नशील राहिले पाहिजे आणि निरंतर प्रयत्न केले तर एक दिवस आपणही आसने उत्कृष्ट प्रकारे करू शकू याबद्दल मात्र विश्वास असायला पाहिजे. संकल्प केवळ करून भागत नाही, तो प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यादृष्टीने पावले टाकली पाहिजेत आणि रोज प्रयत्नशील राहिले पाहिजे. अडथळेही येऊ शकतात. काही वेळा माणूस आजारी पडतो, काही कामामुळे त्याला नियमित ठरवलेले काम किंवा प्रयत्न करता येत नाहीत, अभ्यास करता येत नाही.

>> सीए अभिजित कुळकर्णी
योगशिक्षक, भारतीय योग मंदिर, www.bymyoga.in