
हिंदुस्थानचा हॉकीपटू, माजी कर्णधार संदीप सिंह, ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांनी गुरुवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. हरयाणा राज्याचे भाजप अध्यक्ष सुभाष बराला यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रदेश केला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने दोघांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
2012 ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता आणि 2014 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता योगेश्वर दत्त याने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे प्रभावीत होऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याचे म्हटले. ‘मी मोदींना बऱ्याच काळापासून फॉलो करतो. त्यांच्या कामामुळे मी प्रभावीत झालो. तसेच चांगले काम करण्यासाठी खेळाडूंनीही पुढे यायला हवे. भाजपमध्ये येऊन मला आनंद झाला आहे’, असे योगेश्वर म्हणाला.
विधानसभेचे तिकीट मिळणार?
हरयाणामध्ये महाराष्ट्राप्रमाणेच 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर दोघांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. योगेश्वरला सोनपतमधून तिकीट मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Delhi: Olympic Medallist Yogeshwar Dutt joins BJP (Bharatiya Janata Party), in presence of Haryana Bharatiya Janata Party (BJP) Chief Subhash Barala. pic.twitter.com/9cWmO4Vxe5
— ANI (@ANI) September 26, 2019
Delhi: Former Indian Hockey captain Sandeep Singh joins BJP (Bharatiya Janata Party), in presence of Haryana Bharatiya Janata Party (BJP) Chief Subhash Barala. pic.twitter.com/PAPOiwIO3j
— ANI (@ANI) September 26, 2019

























































