
घर सुंदर आणि नीटनेटपं ठेवायचं असेल तर या काही गोष्टी नक्की करून पहा. सर्वात आधी घरातल्या अनावश्यक वस्तू बाहेर काढा. यामुळे घर प्रशस्त आणि व्यवस्थित दिसेल. भिंतींना नवीन रंग द्या. उशा, पडदे, चादरी यासारख्या वस्तूंसाठी आकर्षक रंगाची निवड करा. फर्निचरची आकारमानानुसार योग्य निवड करा.
घरामध्ये योग्य प्रकाश येईल यासाठी प्रयत्न करा. दिवे व टय़ुबलाईट योग्य जागी लावा. घरात थ्रो पिलो, पडदे यासह कलाकृतीसारख्या वस्तू जोडून घराला आणखी आकर्षक बनवता येईल. घराच्या खिडक्याजवळ छोटी छोटी झाडे किंवा हिरवळ लावण्याचा प्रयत्न करा. यामुळे घर ताजेतवाणे राहील.