शिक्षणासाठी मोबाइल टॅब घेऊन दिला नाही, सतरा वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका सतरा वर्षीय मुलाने आपल्या आईवडिलांकडे आपल्या पुढील शिक्षणासाठी टॅब मोबाईल घेण्याची मागणी केली होती. तो त्याला लगेच न घेऊन दिल्याने त्याने गुरुवारी राहत्या घरी माळवदाच्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील भोजगाव येथे घडली.

या विषयी पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती आशी की, गेवराई तालुक्यातील भोजगाव येथील अभिषेक राजेंद्र संत याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. निकाल अजुन बाकी होता. निकाल लागण्यासाठी काही कालावधी बाकी असताना इथुन पुढचे शिक्षण आता ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने आता आपल्याकडे टॅब मोबाईलची आवश्यकता आहे. तेव्हा त्याने मोबाईलची मागणी घरच्यांकडे केली. त्यावर घरच्यांनी त्याला. थोडे दिवस थांब, सध्या बी- बियाने पेरणीचे दिवस आहेत. ते झाले की घेऊ, असं समजावलं.

त्याची समजून निघाली असं समजून सर्वजण शेतामध्ये गेल्यावर त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरील घटनेची माहिती गेवराई पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम चौबे, पोलीस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ, सहाय्यक फोजदार फड, बीट अमलदार बांगर यांनी येऊन घटनेचा पंचनाम करून अभिषेक याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रूग्णालयात गेवराई येथे पाठवला. सांयकाळी ६ वा सुमारास शवविच्छेदन करून पार्थिव नातेवाईकाच्या स्वाधीन करून रात्री उशिरा भोजगाव येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, आजी व आजोबा असा परिवार आहे. त्याच्या या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.