गोव्यात भीषण अपघात, भरधाव कारची दुचाकीला धडक; तरुणीचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोव्याची राजधानी पणजी येथे एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. डोना पॉला परिसरात भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने एका 23 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले आहे. दीक्षा परवाडकर असे मयत तरुणीचे नाव आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, दीक्षा एका पंचातारांकीत हॉटेलमध्ये कामाला होती. रविवारी रात्री आपली ड्युटी संपवून दीक्षा तिचे सहकारी डी. अरुणकुमार यांच्यासोबत दुचाकीवरून घरी चालली होती. यावेळी बांबोळी-डोना पॉला रोडवर भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यात दीक्षा आणि अरुणकुमार दोघेही जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दीक्षाचा मृत्यू झाला. अरुणकुमार यांच्या उपचार सुरू आहेत.

रविवारी रात्री गोव्यात एका ‘मिनी कूपर कन्व्हर्टिबल’ कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने, २३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून तिच्या २६ वर्षीय सहकाऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताच्या वेळी एका स्थानिक व्यावसायिकाचा २१ वर्षीय मुलगा, डॅरियस डायस, हा कार चालवत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

कारचालक हा गोव्यातील एका व्यावसायिकाचा मुलगा असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. कार नुकतीच खरेदी करण्यात आली होती. कारवर तात्पुरत्या क्रमांकाची नंबरप्लेट होती. पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम 106 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.