
रेट्रो साडीचा ट्रेंड फोलो करणाऱ्या एका तरुणीने सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे युजर्सही बुचकळ्यात पडले आहेत. झलक भवनानी असे या तरुणीचे नाव आहे. ‘जेमिनीला तीळ कसा काय कळला? कसा दिसला?’ असा सवाल झलकने केला आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. गुगल जेमिनीचा नॅनो बनाना ट्रेंड सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. झलक भवनानी या तरुणीने हा ट्रेंड फॉलो करत नॅनो बनाना फिचर वापरले आणि फोटो तयार केले. त्यासाठी तिने फुल बाह्यांचा ड्रेस घातलेला फोटो अपलोड केला होता. त्यामुळे तिच्या हातावरचा तीळ दिसत नव्हता. मात्र काळ्या साडीतील रेट्रो लुकमध्ये तिच्या हातावरचा तीळ स्पष्ट दिसत आहे. ‘माझ्या हातावर तीळ आहे, हे जेमिनीला कसे काय कळले?’, असा सवाल झलकने व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे.





























































