
कानात हेडफोन घालून रेल्वेरूळ ओलांडणाऱ्या तरुणाला इंजिनचा धक्का बसल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.
जयेश संतोष जाधव (वय 32, रा. जुना कासेगाव रस्ता) असे मृताचे नाव आहे.
पंढरपूर-मिरज रेल्वे मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पंढरपूर रेल्वे स्थानकातून निघाली होती. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोरील रुळावरून जयेश जाधव हा कानामध्ये हेडफोन घालून रुळावरून जात होता. हेडफोनमुळे जयेशचे रेल्वेच्या आवाजाकडे लक्ष गेले नाही. यामुळे इंजिनची जोरदार धडक बसल्यामुळे तो जागीच ठार झाला. रेल्वे पोलीस संजय चिटणीस, संतोष पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.






















































